ठळक मुद्देआवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.
चांदवड : शहरात गेल्या दोन दिवसांत घेण्यात आलेल्या १५ पैकी ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात सोमवारपेठमधील ५० वर्षीय पुरुष, जनता विद्यालयाजवळ ६३ वर्षीय पुरुष, हनुमाननगरातील ५५ वर्षीय पुरुष, फुलेनगरमधील १७ वर्षीय तरुणी, रघुनाथनगरातील १५ वर्षीय तरुण, वरचेगाव येथील ६२ वर्षीय महिला असे सहा जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी मास्क वापरावेत, गर्दीत जाणे टाळावे, २ फुटांचे भौतिक अंतर ठेवावे व शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.