त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सहा रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुरु वातीला एक भाडेकरु नंतर त्याच घरातील घरमालिकणीच्या घरातील चार व शेजारील घरातील एक पुरु ष असे सहाजण वेगवेगळ्या वेळी कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. सात दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या सहापैकी तिघे जण नाशिक येथील मोतीवाला कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तर तिघे जण कोव्हीड केअर सेंटर मध्ये दाखल होते. तथापि त्यांना नगरपरिषद प्रशासनाने कोव्हीड सेंटर मधुन थेट शिवप्रासाद या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या भक्त निवासमध्ये सात दिवस ठेउन १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर घरी सोडण्यात आले.यावेळी नगरपरिषदेच्या वतीने प्रभागाच्या नगरसेविका तथा महिला बाल कल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी तुंगार सोनवणे व कार्यालयीन अधिक्षक पायल महाले, अमोल दोंदे, नगरपरिषदेचे कन्टेन्मेन्ट झोनचे कर्मचारी संजय सोनवणे आदी उपस्थित होते.बरे होउन आलेल्या रूग्णांचे त्यांच्या नातेवाईकांनी औक्षण करु न टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. स्थानिक रहिवासीयांनी त्यांना फुले देऊन शुभेच्छा दिल्या.--------------------प्रतिबंधित क्षेत्राबाबत गोंधळत्र्येबकेश्वर तालुक्यात रु ग्ण बरे होउन घरी आले तरी प्रतिबंधित क्षेत्र तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाचा गोंधळ दिसून येत आहे. शासनाच्याच निर्णयाप्रमाणे ज्या दिवशी शेवटचा रु ग्ण आढळला, तेथुन २८ दिवस प्रतिबंधित क्षेत्र लागू होतो. मात्र त्र्यंबक नगरपरिषदेने शेवटचा रु ग्ण बरा होउन घरी आल्यानंतर तेथुन २८ दिवसांचा अफलातुन नियम शहरात लावण्यात आल्याने शहरवासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्र्यंबकेश्वरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात सामाजिक सभागृहा समोरील दोन घरात सहा रूग्ण आढळले. नियमाप्रमाणे १४ दिवस रु ग्णालयात (क्वारंटाईनसह) व तेथुन आणखी १४ दिवस असा क्वारंटाईनचा कालावधी असतो.
त्र्यंबकेश्वरला सहा जणांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 8:44 PM