शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

By admin | Published: May 25, 2015 11:54 PM

बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

येवला : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येवल्यातील लक्ष्मीनारायण रोड शाखेतून जिल्हा बँकेच्याच अंदरसूल शाखेत शाखाधिकारी व शिपाई रिक्षातून ५० लाखांची रोकड घेऊन जात असताना काठीने मारहाण करत रक्कम लुटल्या प्रकरणी सखोल चौकशी अंती तालुका पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. येवला न्यायालयाने या संशयित आरोपींना २८ मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती येवला तालुका पोलीस निरीक्षक पी.बी.पाटील यांनी दिली. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मंगळवारी ११ वाजता सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, नरेश मेघराजानी, पोलीस उपअधीक्षक, मनमाड विभाग, हे या लूट प्रकरणाच्या कार्यवाही संदर्भात पत्रकारांना माहिती देणार आहेत. या प्रकरणी २२ दिवसांपासून केवळ तपास चालू आहे असेच पोलिसाकडून सांगितले जात होते. दरम्यान, तीन दिवसांपासून तपासाची चक्रे वेगाने फिरली असून, तपासाचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा तालुकाभर होती. अंदरसूल येथून सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास कामासाठी मनमाड येथे नेले. या प्रकरणी पोलिसांनी ४० लाखांचा ऐवज हस्तगत केला. यात २७ लाख रु पये रोख, लुटारूनी खरेदी केलेली एक तवेरा गाडी ( एमएच १५, ईएक्स ०२४४) व नंबर प्लेट नसलेली नवी स्प्लेंडर गाडी पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते. या प्रकरणी अजित रामदास कोल्हे, नंदकिशोर किसनराव धनगे, शंकर काशीनाथ धनगे, शेख तौशीफ शकील, शंकर भगवान मिसाळ, संतोष गोरख वल्टे यांना पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतल्याचे समजते. (वार्ताहर)