मालेगाव : येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच, शुक्रवारी एकाच कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने प्रशासन धास्तावले आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडल्याने मालेगावात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे.राज्यातील कोरोनाचा कहर वाढतच चालला असून, त्यामुळे शासन व प्रशासन गतीने कामाला लागले आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ मालेगावदेखील हॉटस्पॉट ठरले असून, राज्यात मालेगाव हा एकमेव असा तालुका ठरला आहे, जेथे बाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे, तर तेथील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही दोन अंकी झाली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मालेगावमधील यंत्रणा अधिक प्रभावी व कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार मालेगावमध्ये आणखी सहा कोरोनाबाधित आढळले असून, यापूर्वीच्या बाधिताच्या एकाच कुटुंबातीलच हे नवीन सहा रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालेगाव शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध पोलिसांतर्फे कडक कारवाई केली जात आहे. मालेगावच्या सीमेलगत असलेल्या खेडेगावात मात्र लॉकडाउन नुसते नावापुरते आहे की काय, असा सवाल सर्वसामान्य जागरूक नागरिक विचारत आहेत. क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठं असलेल्या दाभाडी गावाचा विस्तार बºयाच प्रमाणात झालाय. वाड्या-वस्त्यांनी विकसित झालेल्या गावात संचारबंदीचा बोजवारा उडाल्याचे चित्र बघावयास मिळतंय. पोलीस आल्यावर बाजूला होणं आणि नंतर आहे तसेच वर्तन बघावयास मिळतंय, त्यामुळे भविष्यात कुणी कोरोना आणल्यास परिस्थिती चिंंताजनक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मालेगावी एकाच कुटुंबातील सहा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:16 PM