शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लोकसभेसाठी कॉँग्रेसला हव्या निम्म्या जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:21 AM

तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने विश्वास बळावलेल्या कॉँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी उत्तर महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक पक्षाचे सचिव व समन्वयक आमदार चेल्लर वामसीचंद रेड्डी यांच्या उपस्थितीत दिवसभर जिल्हानिहाय बैठका होवून त्यात संभाव्य उमेदवारांनी चाचपणी व पक्ष बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्टÑातील लोकसभेच्या आठ जागांपैकी निम्म्या जागा कॉँग्रेसला सुटाव्यात, असा आग्रह प्रत्येक जिल्ह्णाकडून धरण्यात आला.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्राची बैठक : चेल्लर रेड्डी यांच्या उपस्थितीत घेतला आढावा

नाशिक : तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने विश्वास बळावलेल्या कॉँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी उत्तर महाराष्टÑातील कॉँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक पक्षाचे सचिव व समन्वयक आमदार चेल्लर वामसीचंद रेड्डी यांच्या उपस्थितीत दिवसभर जिल्हानिहाय बैठका होवून त्यात संभाव्य उमेदवारांनी चाचपणी व पक्ष बांधणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्टÑातील लोकसभेच्या आठ जागांपैकी निम्म्या जागा कॉँग्रेसला सुटाव्यात, असा आग्रह प्रत्येक जिल्ह्णाकडून धरण्यात आला.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरू केलेले जनसंपर्क अभियान, बुथ कमिट्या व शक्ती अ‍ॅपच्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तत्पूर्वी रेड्डी यांनी प्रत्येक जिल्ह्णाचे अध्यक्ष व शहराध्यक्षांकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मनोगत जाणून घेण्यात आले.प्रत्येक जिल्ह्णाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला जागा मिळावी, असा आग्रह धरताना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचविण्यात मदत होणार असल्याचे सांगितले. दिवसभर चाललेल्या या बैठकीनंतर रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हटले, तीन राज्यांच्या निवडणूक निकालामुळे निवडणूक यंत्रणा आणि पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा काळ ओसरल्याचा अनुभव भारतीय जनता पक्षाने घेतला असून, भाजपाच्या धनशक्तीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले तर, तीन राज्यांप्रमाणे महाराष्टÑातही पक्षाचा विजय निश्चित आहे. त्यासाठी बुथ यंत्रणा सक्षम करून निवडणूक जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघपणे कामाला लागावे त्याचबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर विजय मिळवून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गिफ्ट द्या, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, जळगावचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, धुळ्याचे अध्यक्ष श्याम सनेर, अहमदनगरचे शेलार, जयप्रकाश छाजेड आदींसह विविध मान्यवरांनी आपापल्या जिल्ह्णातील संघटनात्मक बाबींबाबत माहिती देऊन चर्चा केली.प्रास्ताविक राजाराम पानगव्हाणे यांनी, तर स्वागत शहराध्यक्ष शरद अहेर यांनी केले. याप्रसंगी नाशिकचे सहप्रभारी डी. जी. पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, जयप्रकाश छाजेड, नानासाहेब बोरस्ते, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. हेमलताताई पाटील, शाहू खैरे, शंकरराव अहिरे, रमेश कहांडोळे, प्रसाद बापू हिरे, भारत टाकेकर, दिगंबर गिते, नंदकुमार कर्डक, अनिल भामरे, शांताराम लाठार, वत्सलाताई खैरे, लक्ष्मण जायभावे, दिनेश चोथवे, सखाराम भोये, सुनील आव्हाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.भुजबळ असतील तरच जागा सोडानाशिक जिल्ह्णाच्या वतीने बाजू मांडताना पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्णातील किमान लोकसभेची एक जागा तरी मिळावी, असा आग्रह धरला. त्यानुसार उपस्थित वरिष्ठ पदाधिकाºयांनीही चर्चा करून एक जागा काँग्रेससाठी सोडवून आणण्याचा चांद रेड्डी यांनी आश्वासन दिले. पक्षाचे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचले नाही तर त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या जागेवर राष्टÑवादीकडून छगन भुजबळ उमेदवार असतील तर ठीक, अन्य उमेदवार असल्यास त्यापेक्षा कॉँग्रेससाठी ही जागा घ्यावी, पक्षाकडून अनेक इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ं

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेस