सिन्नर : पंचायत समिती व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विषय शिक्षकांचे एकूण सहा टप्प्यात प्रशिक्षण घेण्यात आले. येथील भिकुसा विद्यालयात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात इंग्लिश इको सिस्टिम, लर्नर्स क्लब, इंग्लिश क्लबची स्थापना, लाइव्ह इंग्लिश या विषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी कृतिशील उपक्रम, कृतीतून इंग्रजी भाषा शिकणे, गाणे, कविता सादर करणे, प्रश्न तयार करणे, मुकाभिनय, इंग्रजी भाषिक खेळ, शिक्षक - विद्यार्थी सभा आयोजित करणे, आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे याबद्दल माहिती देण्यात आली. दर शनिवारी इंग्रजी भाषा दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले. या दिवशी विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून संवाद साधावा, इंग्रजीतून परिपाठ करणे, असे मार्गदर्शक प्रशिक्षक संजय शेलार आणि तालुका समन्वयक संदीप गिते यांनी सांगितले. प्रशिक्षणात गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी राजीव लहामगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेविषयी आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. भिकुसा विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती दारोळे, विश्वनाथ शिरोळे यांनीही मार्गदर्शन केले. मिलिंद खैरनार व हरीश वाणी यांनी लाइव्ह इंग्रजी विषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक म्हणून संजय शेलार आणि संदीप गीते यांनी काम पाहिले.
इंग्रजी शिक्षकांचे सिन्नरला सहा टप्प्यात प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:39 PM
सिन्नर : पंचायत समिती व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी विषय शिक्षकांचे एकूण सहा टप्प्यात प्रशिक्षण घेण्यात आले.
ठळक मुद्देइंग्रजी भाषा दिन साजराभाषेविषयी आत्मविश्वास निर्माण