कोरोनामुळे मागील संपूर्ण वर्ष कसेबसे घालवले. काहींनी रिक्षा विकून टाकल्या अन् मिळेल ते काम सुरू केले. त्यात पेट्रोलच्या किमतीही भरमसाट वाढल्या. त्यामुळे रिक्षा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. लोकांकडून कर्ज घेऊन मागचे वर्ष कसबसे लोटले, त्यानंतर व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर कसाबसा रिक्षा व्यवसाय सुरू झाला. घरी चूल पेटू लागली तर पुन्हा कोरोना वाढला आणि शासनाने निर्बंध लादले. निर्बंध कडक केल्याने एका वेळी पूर्ण क्षमतेने प्रवासी बसवता येत नाहीत. मर्यादित प्रवाशांचे निर्बंध असल्याने आणि कोरोनाची दहशत असल्याने प्रवासी रिक्षात बसेनासे झाले आहे. रोज सकाळी रिक्षा सॅनिटाइझ करायचा खर्चही वाढला. त्यात कोण प्रवासी कसा याची शाश्वती नसल्याने बाधित प्रवासी आल्यास आपल्याला कोरोना होईल अशी रिक्षा चालकांना भीती वाटते. त्यामुळे स्वतः रिक्षा चालक दहशतीत असताना त्याच्या कुटुंबीयांनादेखील भीती वाटते. या निर्बंधांमुळे रिक्षा चालकांची उपासमार होऊ लागली असून शासनाची पंधराशे रुपयांच्या मदतीची घोषणा हवेतच विरते की काय? असे वाटू लागले आहे.
इन्फो
खरे रिक्षा चालक दूरच
बरेच लोक रिक्षाचे परवाने काढून रिक्षा भाड्याने देतात. राज्य शासनाकडून केवळ परवानाधारक रिक्षामालकांना पंधराशे रुपयांची मदत मिळणार असल्याने रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोट....
मालेगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत काम सुरू आहे. तालुक्यात साडे सहा हजार परवानाधारक रिक्षा चालक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली जात आहे.
- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
फोटो - ०४ ॲटो
===Photopath===
040521\04nsk_14_04052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०४ ॲटो