लासलगाव : लासलगाव ग्रामीण रु ग्णालयातील कोविड सेंटरमधून पिंपळगाव बसवंत येथील २५ वर्षीय महिला व सहा वर्षांचा बालक या दोन व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. लासलगाव कोविड सेंटरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून त्यांना हसतमुखाने निरोप देण्यात आला.या रु ग्णांना सोडतेवेळी रु ग्णवाहिका निर्जंतुकीकरण करून या रु ग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, सध्या लासलगाव कोविड सेंटरला पिंपळगाव बसवंत येथील सात, चांदोरी येथील एक व बेहेड येथील एक रु ग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती कोविड सेंटर प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली.यावेळी ग्रामीण रु ग्णालय अधीक्षक डॉक्टर अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, कोविड नर्सिंग इनचार्ज तनपुरे, ज्ञानेश्वर शिंदे, रामू जाधव, संतोष निरभवणे, मामा शिंदे, दत्तूू शिंदे, गणेश भवर, दिलीप जेऊघाले, सिस्टर सोनवणे, कोळी आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सहा वर्षीय बालकाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 5:08 PM
लासलगाव : लासलगाव ग्रामीण रु ग्णालयातील कोविड सेंटरमधून पिंपळगाव बसवंत येथील २५ वर्षीय महिला व सहा वर्षांचा बालक या दोन व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. लासलगाव कोविड सेंटरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून त्यांना हसतमुखाने निरोप देण्यात आला.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंतचे दोन रु ग्ण झाले बरे; पुष्पवृष्टी करून दिला निरोप