नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून रेल्वे आणि बससेच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजाराच्यावर परप्रांतीय मुजरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणा-या मजुरांची संख्या सर्वाधिक आहे तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.कोरोनामुळे उद्वलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांंचे लोंढे गावाच्या दिशेने निघाले आहेत. गावाकडे जाणाऱ्यांना मुजरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी प्रशाासनाकडून रेल्वे गाड्या तसेच बसेसची व्यवस्था केली जात आहे. गावी जाण्यासाठी तहसिलदारांकडे नोंदणी केलेल्या आणि संबंधित राज्यांकडून एनओसी प्राप्त झाल्यानंतर संबंधित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली जाते. नाशिाकरोड रेल्वे स्थानकातून आत्तापर्यंत सहा रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत तर एक गाडी औरंगाबाद येथून सुटल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सदर गाडीतून रवाना करण्यात आले. या सर्व गाडयांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे. गेल्या एक मे पासून अनेकदा मध्यप्रदेश, उतर प्रदेश आणि बिहारसाठी गाडा सोडण्यात आलेल्या आहेत.बुधवारी (दि.२०) नाश्कि ग्रामीण विभागातून सहावी रेल्वे गाडी बिहार राज्यातील हाजीपूर येथे १५८७ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या प्रवाशांच्या तिकीटाचे सुमारे ११ लाख रुपये महाराष्टÑ शासनाने भरले आहेत. गेल्या नऊ तारखेपासून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक प्रवासी हे उत्तरप्रदेशचे प्रवासी आहेत. ग्रामीण भागात अजूनही तहदिलदारांकडे परप्रांतय मजुरांकडे नावनोंदणी सुरूच असून येत्या ३१ तारखेच्या आत जास्तीत जास्त प्रवाशाांना त्यांच्या मुळ गाठी पाठविण्याची तयारी केली जात आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मुळ गावी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसार शहरी भागाची जबाबदारी ही महापालिका आणि पोलीस उपायकुतांकडे देण्यात आलेली आहे तर ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सांभाळत आहेत. गेल्या ९ तारखेपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक ३३ हजार ८८३ प्रवाशांची वाहतूक अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. राजस्थान, बिहार,केरळ, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओडीसा, वेस्टबंगाल आदि राज्यांतील प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यातून येणाºया सर्वाधिक प्रवाशांना थेट ठाणे जिल्ह्यातून पिकअप करण्यात आले.
प्रवास सुरूच : परप्रांतीय मजुरांना घेऊन धावली सहावी रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 8:08 PM
या सर्व गाडयांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे. गेल्या एक मे पासून अनेकदा मध्यप्रदेश, उतर प्रदेश आणि बिहारसाठी गाडा सोडण्यात आलेल्या आहेत.
ठळक मुद्देरेल्वेने आत्तापर्यत साडेसात हजार मजूर पोहचले गावी