कळवण : देवळा तालुक्यातील भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीस होत्या.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना दुसानीस यांनी एसकेडी स्कूलच्या प्रगतीचे कौतुक केले. स्नेहसंमेलनांमधून शिक्षकांची कलात्मकता, सृजन आणि मुलांनी त्याला दिलेली साथ याचा सुरेख संगम यानिमित्त अनुभवता आल्याचे सांगून मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या, असा मोलाचा सल्ला मृणाल दुसानीस यांनी पालकांना दिला.लहान मुलांच्या या स्नेहसंमेलनला पालकांची हजेरी लक्षणीय होती. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. कार्यक्र माची सुरु वात गणेश वंदनाने झाली.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ, वाखारी केंद्राचे क ेंद्रप्रमुख संजय ब्राह्मणकार, संस्थेच्या सचिव मीना देवरे, भूषण पगार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातून यशस्वी विद्यार्थी घडविणार असल्याचे सांगितले.सुधीर सोनवणे यांनी आभार मानले. विद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख शोभा जाधव,नयना पवार, प्राचार्य एस. एन.पाटील, एन.के. वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 11:40 PM