सिन्नर - सगर विद्या प्रसारक संचलित येथील महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांची आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा पार पडली.इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेत आकाशकंदील बनविणे, शुभेच्छा पत्रे, उटने बनविणे, पणत्या सजावट अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या. त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन शाळेचे शिक्षक अनिल धनराव, छाया लोंढे, माधुरी कळसे यांनी केले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षणाचे बीजारोपण व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव या कार्याशाळेतून मिळत असल्याचे प्राचार्य सौ. वंदना साळुंके यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या स्वनिर्मितिचा आनंद झळकत होता.
आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 5:47 PM