विद्यालयातील कला शिक्षक राजेंद्र निकम यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी हे आकर्षक कंदील बनविले आहे. विद्यालयातील मुले व मुलींनी घरातील व घराबाहेरील पडलेल्या कागद, सजावटीचे साहित्य, आईसक्रीमच्या काड्या, चहाचे कप व लग्न पत्रिका आदी टाकून दिलेल्या साहित्यांपासून विविध रंगीबेरंगी आकाश कंदील बनविले आहे. सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी बनविले हे आकाश कंदील शनिवारी सकाळी विद्यालयातील प्रांगणात विद्यार्थ्यांना व नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. टाकाऊ वस्तूपासून बनविलेल्या आकाशकंदील पाहून नागरिकांनी व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शैला बैरागी, शिक्षक जे. डब्लु. सुर्यवंशी, डी. पी. बोडके, सुधीर सांगळे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. टाकाऊ पासून टिकाऊ या धर्तीवर विद्यालयात दिवाळीत घरासमोर लावले जाणारे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: बनविले. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या दिक्षा जेजुरकर या विद्यार्थिनीने तीनशे कागदी चहाच्या कपांपासून बनविलेला आकाशकंदील सर्वांत आकर्षक ठरला.
टाकाऊ वस्तूपासून विद्यार्थ्यांनी बनविले आकाशकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 5:31 PM