ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील ठाणगाव परीसरात जंगलात असलेल्या वृृृक्षांची दिवसाढवळया कत्तल केली जात असून वनविभागाने जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.परीसरातील मारूतीचा मोडा, शिवाची नळी, वल्याचा डोंगर, उंबरदरी धरण परीसरात जंगलाची दिवसाढवळया कत्तल केली जात आहे. जंगलात जनावरे चारणारे लोक दिवसा मोठ-मोठी झाडे तोडून ठेवतात व दोन-तीन दिवसानंतर घरी घेऊन येतात. जंगलतोड केल्यानंतर सरपणाची मोळी बांधून रात्री सात-आठ वाजता अंधार पडल्यानंतर घरी घेऊन येतात. वनविभागाचे कर्मचारी दिवसभर डोंगरावर तळ ठोकून असतात पण जंगलतोड करणारे ज्या दिवशी वन कर्मचारी येतात त्या दिवशी जंगलाकडे फिरकतच नाही.मारूतीच्या मोंडा परीसरात वृक्षाचे प्रमाण जास्त असून या भागातच जंगलतोड मोठया प्रमाणात केली जाते. मोठ-मोठी वृक्ष तोडली जात असून वनविभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात यात आहे.मारुतीचा मोंडा परीसरात जंगल जास्त आहे. शेळ्या चारणाºया महिला शेळ्यांना पाला खान्यासाठी झाडाच्या फांद्या तोडतात. तोडलेल्या झाडाच्या फांद्या दोन दिवसानंतर सरपण करून ते तोडलेले जळावू लाकडाच्या मोळ्या त्याच ठिकाणी ठेवतात. रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच सरपणाची मोळी घरी घेऊन येतात. रात्रीच्या वेळी वनकर्मचारी गावातून गेले की जंगलतोड करणारी माणसे जळावू लाकडे आणण्यासाठी जंगलात जातात.
ठाणगाव परिसरातील जंगलात वृृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 5:54 PM