शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

चिरला गळा : नायलॉन मांजाने घेतला दुचाकीस्वार महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 9:07 PM

नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले.

ठळक मुद्देद्वारका उड्डाणपुलावर घडली दुर्दैवी दुर्घटना मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला

नाशिक : नोकरदार महिला दुचाकीने सायंकाळच्या सुमारास घरी परतत असताना, अचानकपणे पतंगीचा तुटलेला नायलॉन मांजा गळ्यावर घासला गेल्याने दुचाकीस्वार महिलेचा गळा चिरला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२८) द्वारका परिसरात घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पक्ष्यांसह मानवाच्या जिवाला घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाचा सर्रास विक्रीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नायलॉन मांजावर असलेली बंदी केवळ कागदावरच का? असा सवाल संतप्त नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.सातपूर येथील एका खासगी कंपनीतून दिवसभराचे काम आटोपून भारती मारुती जाधव (४६,रा. सिद्धिविनायक टाउनशिप, साईनगर, अमृतधाम) या त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५. ५९५४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी जात होत्या. द्वारका चौकातून त्यांनी उड्डाणपूलावरुन दुचाकी नेली असता काही अंतर पुढे जात नाही, तोच हवेत तुटून आलेल्या नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णालयात आल्यानंतर तपासून जाधव यांना मयत घोषित केले.

टॅग्स :Accidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयkiteपतंगWomenमहिलाDeathमृत्यू