नाशिक : पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी या परिसरात बाहेर पडताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगून सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी.फुले यांनी केले आहे.मखमलाबाद शिवारातील जगझाप मळा, कोशिरे मळा, गोसावी मळा, मखमलाबाद-रामवाडी रस्त्याचा परिसर, डावा कालवा भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे खात्रीशिर पुरावे वनविभागाच्या गस्त पथकाला आढळून आले आहे. या भागात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे तैनात करण्यात आले आहे. काही भागात ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्याची तयारी वनविभागाकडून करण्यात आलीआहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सकाळी सुर्योदय झाल्यानंतरच ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडावे. एकटे मॉर्निंगवॉकला न जाता गटागटाने जावे. सामसुम निर्जन परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर फेरफटका मारणे टाळावे. वर्दळीच्या मुख्य रस्त्याने फेरफटका मारण्यास प्राधान्य द्यावे. कानात इयरफोन लावून गाणे न ऐकता मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावी. या भागात राहणाºया शेतकºयांनी आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी बंदिस्त निवाºयात ठेवावे. रात्रीच्या वेळी मळे भागात शेकोटी पेटवावी, अशा विविध उपाययोजना वनविभागाकडून सुचविण्यात आल्या आहेत. तसेच नियमितपणे सकाळ-संध्याकाळ गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथकाला लोकांनी सहकार्य करत योग्य माहिती द्यावी. अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे फुले यांनी ‘लोकमत’शाी बोलताना सांगितले.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावाया भागात बिबट्याचा मुक्त संचार हा मोकाट कुत्र्यांच्या आकर्षणापोटीदेखील असू शकतो त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून या भागात सातत्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्ताची मोहीम राबविणे गरजेचे आहे. बिबट हा उपलब्ध अधिवासाशी जुळवून घेणारा वन्यप्राणी आहे. कुत्र्यांनादेखील तो खाद्य बनवितो. त्यामुळे या भागातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे मत वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.
बिबट्याचा मुक्त संचार : ‘मॉर्निंग वॉक’ करा, पण जरा जपून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 2:42 PM
नाशिक : पंधरवड्यापासून मखमलाबाद शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बिबट्या या भागात नागरिकांना दर्शन देत ...
ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावाअफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नयेदोन पिंजरे तैनात करण्यात आले आहे.