शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:34 PM

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

ठळक मुद्देउमराणे : शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी केली गर्दी; पाणी साठवण क्षमता वाढणार

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.उमराणे येथे सन १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. १३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या धरणात ७० चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रातुन दरवर्षी वाहुन येणाºया पाण्याबरोबर हजारो घनमिटर गाळ वाहुन आला आहे. परिणामी या गाळामुळे ११८ द.ल.घ.फुट पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता अवघ्या ५८ द.ल.घ.फुटावर आली आहे. क्षमता कमी झाल्याने चालुवर्षी उमराणेसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धरणातील गाळ पुर्णपणे काढण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनानेकडे वारंवार मागणी केली आहे. असे असताना गाळ भरुन देण्यासाठी युवा मित्र फाऊंडेशकडुन एक पोकलॅड मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.शेतीसाठी उपयुक्त गाळ असल्याने परिसरातील शेतकºयांनी गाळ वाहुन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गाळ उपसा शुभारंभ येथील शेतकरी बाळासाहेब देवराम देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, रामेश्वर गो शाळेचे संचालक सुनील देवरे, हेमंत देवरे, दिपक देवरे, साहेबराव देवरे, रतन मोरे आदींसह बहुतांश शेतकरी बांधव उपस्थित होते.प्रशासनाकडुन शेतात गाळ टाकण्यासाठी धरणातील गाळ उपसा करण्यास परवानगी असुन शेती सुपिक होण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ उपसा करावा.- व्ही. जी. पाटील, मंडल अधिकारी, उमराणे.बºयाच वर्षांपूर्वीचा गाळ साचला असल्याने हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु सद्यस्थितीत गाळ भरुन देण्यासाठी एकच मशीन असल्याने ट्रॅक्टर भरणाºयांची गर्दी होत आहे. प्रशासनाने अजून एक, दोन मशिन उपलब्ध करून द्यावे.- शरद देवरे, शेतकरी(फोटो ०९ परसुल डॅम)