पर्यटन स्थळ पडली ओस
नाशिक : मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे ओस पडली असून या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील फुल विक्रेते पर्यायाच्या शोधात
नाशिक : ऐन लग्न सराईत विवाह सोहळ्यांवर निर्बंध आले असतानाच आता मंदिरेही बंद झाल्याने शहरातील फुल विकेते अडचणीत आले आहेत. केवळ या व्यवसायावर पोट भरणाऱ्या अनेक व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुलांचा व्यवसाय करण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधण्याकडे कल वाढू लागला आहे.
बागायती पिकांच्या उत्पादनावर परिणाम
नाशिक : यंदा उन्हाळा कडक असल्यामुळे मार्च महिन्यापासूनच उष्णता जाणवू लागली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून त्याचा बागायती पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: कांद्याला याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
उपनगर परिसरात कमी दाबाने पाणी
नाशिक : उपनगर परिसरात काही भागात नेहमीच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी ताटकळत रहावे लागते. महापालिकेने पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्रस्त महिलांनी केली आहे.
अवैध मद्य विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील अनेक भागात सर्रासपणे अवैध मद्यविक्री होत असून यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही वस्तुूच्या कृत्रिम टंचाईला सुरुवात
नाशिक : राज्य शासनाने कडक निर्बंधांची घोषणा करताच काही वस्तूंचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वस्तुंची टंचाई नसतानाही विक्रेत्यांनी दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
काही भागात अवैध मार्गाने दुकाने सुरू
नाशिक : मुख्य बाजारातील दुकाने वेळेवर बंद होत असली तरी काही भागात अवैध मार्गाने रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू रहात असल्याचे दिसून येत आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही होत असते. पोलिसांनी अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जमावबंदी आदेशाने इच्छुकांमध्ये नाराजी
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, कारोनाच्या संकटामुळे यात व्यत्यय येत आहे. त्यात आता शासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने याबाबत अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संपर्क वाढविण्यासाठी काहींनी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे.
बाजार समित्यांचे गर्दीकडे दुर्लक्ष
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलावाच्यावेळी होण्याऱ्या गर्दीकडे बाजारसमिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. लिलावाच्यावेळी अनेक शेतकरी आणि व्यापारी एकत्रित येत असल्याने गर्दी होते. याबाबत बाजार समिती प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जयभवानी रोडवर वाहनांची वर्दळ वाढली
नाशिक : जयभवानी रोडवर वाहनांची गर्दी वाढली असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या परिसरात दाट लोकवस्ती असून अनेक ठिकाणी लहान मुले खेळत असतात. यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे.