शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

उधळले ‘स्मार्ट सिटी’चे सादरीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:44 AM

केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले जाते तसेच लोकप्रतिनिधींना संचालक म्हणून घेऊन कंपनीत घेऊनही विश्वासात घेतले जात नाही, नेहरू उद्यानासारखे प्रकल्प अर्धवट असतानाच त्याचे लोकार्पण परस्पर आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन केले जात नसेल तर काय उपयोग? असा थेट प्रश्न करीत महापौर रंजना भानसी यांच्यासह दिनकर पाटील, शाहू खैर यांनी संताप व्यक्त केला. मुंढे यांची हुकूमशाही आणि हिटलरशाही चालू दिली जाणार नाही आणि संचालकांना विश्वासात न घेताच काम करीत असेल तर बऱ्या वाईट निर्णयांना मुंढे-थवील हेच जबाबदार राहतील असे सांगत ‘स्मार्ट सिटी’ कंपनीचे सादरीकरणच गुंडाळले.

ठळक मुद्देसंचालकांचा संताप : ...ही मुंढे-थविलांची लिमिटेड कंपनी, महापौरांसह नगरसेवकांनी डागली तोफ

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारची नाशिककरांसाठी असलेली स्मार्ट सिटीची योजना वीस लाख नागरिकांची असताना प्रत्यक्षात मात्र आयुक्त तुकाराम मुंढे आणि मुख्य कार्यकारी प्रकाश थवील यांचीच ती कंपनी झाली आहे. कोणतेही निर्णय परस्पर घेतले जातात, संचालकांना अंधारात ठेवले जाते तसेच लोकप्रतिनिधींना संचालक म्हणून घेऊन कंपनीत घेऊनही विश्वासात घेतले जात नाही, नेहरू उद्यानासारखे प्रकल्प अर्धवट असतानाच त्याचे लोकार्पण परस्पर आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन केले जात नसेल तर काय उपयोग? असा थेट प्रश्न करीत महापौर रंजना भानसी यांच्यासह दिनकर पाटील, शाहू खैर यांनी संताप व्यक्त केला. मुंढे यांची हुकूमशाही आणि हिटलरशाही चालू दिली जाणार नाही आणि संचालकांना विश्वासात न घेताच काम करीत असेल तर बऱ्या वाईट निर्णयांना मुंढे-थवील हेच जबाबदार राहतील असे सांगत ‘स्मार्ट सिटी’ कंपनीचे सादरीकरणच गुंडाळले.दरम्यान, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या आत्तापर्यंत दहा बैठका झाल्या असून, सर्व बैठकीत हजर संचालकांच्या मंजुरीनेच कामे होत असल्याचे सांगितले तसेच संचालकांच्या मतभेदामुळेच नेहरू उद्यानाचे लोकार्पण होऊ न शकल्याचा दावा केला. त्यामुळे उपस्थित संचालकांनी त्याचा निषेध केला.नाशिक शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झाल्यानंतर स्थापन झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गोदा प्रोजेक्ट आणि एबीडी म्हणजे गावठाण विकास प्रकल्पाची माहिती देण्यासाठी पंचवटीतील पं. पलुस्कर सभागृहात शनिवारी (दि.१७) नगरसेवक आणि नागरिकांची बैठक बोलविली होती. यावेळी हा प्रकार घडला. आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्या संघर्षात गेल्या बुधवारी (दि.१४) नेहरू जयंतीच्या दिवशी नेहरू उद्यान आयुक्तांनी परस्पर खुले केल्याच्या प्रकरणाची भर पडली. त्याचे पडसाद शनिवारी (दि.१७) स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यक्रमात उमटले. आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे यांच्यासह काही नगरसेवकांनी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमास हजेरी लावली.प्रकल्पाच्या शंका समाधानाच्या वेळीच स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक असलेल्या महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांना नेहरू उद्यानात असलेल्या पाच पुतळ्यांची नावे सांगता येत नाही आणि अर्धवट असलेल्या अशा उद्यानाचे परस्पर लोकार्पण करण्याचे कारण काय, वास्तविक कंपनीने आदल्या दिवशी लोकार्पणाचा प्रस्ताव आणल्यानंतर सर्व नगरसेवकांना आणि नागरिकांना बोलवून नंतर लोकार्पण करू, असे सांगितले होते. शेवटी त्या प्रभागाचे नगरसेवक, आमदार आणि अन्य सर्व नगरसेवकांना मान देऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत त्याचे लोकार्पण करणे आवश्यक होते.स्मार्ट सीटी कंपनी मुंढे यांना आंदण दिली काय?सभागृह नेते दिनकर पाटील यांनी स्मार्ट सिटी कंपनी मुंडे-थवील यांना आंदण दिली आहे काय? असा प्रश्न केला. कालिदास कलांमदिराप्रमाणेच नेहरू उद्यानाचे परस्पर लोकार्पण केले. लोकशाही आहे की नाही, महापालिकेत असा प्रश्न करून मखमलाबाद येथे सातशे एकरावर नगरविकासाचे आरक्षण टाकून शेतकºयांना अडचणीत आणले आणि आता दोन लाख ७० हजार घरे अतिक्रमित ठेवून शहर उद््ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. मखमलाबाद येथील प्रकल्पासंदर्भात तर अहमदाबाद दौरा केला जाणार असून, त्यासाठी कंपनीचे अधिकारी तवली यांनी येणार असेल तर कळवा, असे पत्र संचालकांना दिले असे सांगत संताप व्यक्त केला, तर शाहू खैरे यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेत लोकप्रतिनिधींचा वेळोवेळी अपमान केला जात असल्याने स्मार्ट सिटी कंपनी नसली तरी चालेला असा पवित्रा शाहू खैरे यांनी घेतला. तर अनेक प्रश्न विचारणाºया जगदीश पाटील यांनी नगरसेवकांनी सूचना देऊन त्याची दखल प्रशासन घेणार नसेल तर आम्ही काय ‘मम’ म्हणायला आहोत का? असा प्रश्न केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी