नाशिक : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीतील योजनांची कामे संथगतीने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामांचा अहवाल तातडीने मागवला आहे. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी (दि.१४) दिवसभर व्यस्त होती.स्मार्ट सिटी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबर महिन्यात नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात बैठक घेतली होती. यात स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचा आढावा त्यांनी घेतला तसेच शहरातील जलवाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासाठी अमृत योजनेतून तर मलवाहिका टाकून मलनिस्सारण योजनेच्या क्षमतेत वाढ करणे या कामासाठी नदी सुधारणा योजनेतून सातशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे शहर बस वाहतूक कंपनीमार्फत चालविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांना अहमदाबाद येथे नेऊन तेथील योजना दाखवा असे निर्देश दिले होते. याशिवाय सध्या शहरात स्मार्टरोड, ई-पार्किंग, बायसिकल शेअरिंग यांसह अन्य अनेक कामे सुरू आहेत. दरम्यान, शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली असून, अपेक्षित गतीने कामे होत नसल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे.अडीचशे कोटी पडूनस्मार्ट सिटी कंपनीकडे सुमारे अडीचशे कोटी रुपये पडून आहेत, तर गावठाण विकास क्षेत्रांतील अनेक कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. तथापि, कामांची आवश्यक ती गती दिसत नसून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा अहवाल मागविल्याचे वृत्त आहे.
मुख्यमंत्र्यांनी मागितला ‘स्मार्ट सिटी’चा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:40 AM
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीतील योजनांची कामे संथगतीने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामांचा अहवाल तातडीने मागवला आहे. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी (दि.१४) दिवसभर व्यस्त होती.
ठळक मुद्देयंत्रणा व्यस्त : महापालिकेची धावपळ