नाशिक- सध्या कोरोनाच्या वाढत्य संक्रमणामुळे शहरात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांना ऑक्सीजन जनरेशेन प्लांट उभारणार आहे. त्या माध्यमातून नाशिककरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी दिली.
प्रश्न- सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यासंदर्भात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत काही होऊ शकेल काय?थविल- शहरात कोराेनाचा कहर वाढत चालला आहे. त्यातही ऑक्सीजन बेड मिळणे कठीण हाेत आहे. नागरीकांना प्राणवायु मिळावा यासाठी ऑक्सीजन प्लांट उभारण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
प्रश्न- प्लांटचे स्वरूप कसे असेल आणि कधीपर्यंत काम होऊ शकेल?थविल- महापालिका आयुक्त कैलास जाधव यांंच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. पाचशे जम्बो सिलींडर ऑक्सीजन रोज भरता येतील असा प्रकल्प उभारण्याचे नियेाजन आहे. महापालिका देखील पाचशे सिलींडर क्षमतेचा प्लांट उभारणार आहे. त्या पाठोपाठ स्मार्ट सिटीने देखील इतक्याच क्षमतेचा प्लांट उभारण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात बेस रेट आणि अन्य तपशील मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
प्रश्न- सध्या शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांची स्थिती काय आहे.थविल- कंपनीचे महत्वाची कामे सुरळीत सुरू आहे. गाेदावरी नदीतील गाळ काढणे, होळकर पुलाखालील गेट, गोदा सुशोभीकरण आणि गावठाण विकास योजनेतील रस्ते, पाईप लाईनची कामे सुरू आहेत. अर्थात, सध्या कोरोनामुळे बिगारी आणि अन्य कामगार वर्ग भीतीमुळे कामावर येत नाही तसेच शासनाच्या आदेशानुसार कमीत कमी स्टाफच्या क्षमतेत कंपनीचे काम भागवले जात आहे.