नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील हा भाग आहे. तसेच पावसाळा सुरू झाला असताना या रस्त्याच्या विकासाचा घाट घातला जात आहे. स्मार्ट सीटीच्या कामाचा पूर्वानुभव बघता या ठिकाणी मोठा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत.स्मार्ट सिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या रस्ते विकासाच्या कामामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या कामाला अडथळा होऊ नये, यासाठी पहिल्या टप्प्यात जिजामाता चौकापासून ते गाडगेमहाराज पुलाकडे जाणाºया दहीपुलाच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुसºया टप्प्यात वंदे मातरम चौक (धुमाळ पॉइंट) ते जिजामाता चौकापर्यंतच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे; मात्र पावसाळ्यात या गजबजलेल्या परिसरात ही कामे हाती घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे...तर पाण्यात बुडेल बाजारपेठया जाणाºया रस्त्यांच्या कामामुळे दहीपूल, धुमाळपाइंट, जिजामाता चौक या उंचसखल भागात खट्टे खोदले जाणार आहे. यामुळे पावासाचे पाणी या भागात अधिक प्रमाणात साचेल आणि पाण्याचा निचरा होण्यासही अडथळा निर्माण होईल, यामुळे बाजारपेठ मोठा पाऊस झाला तर बुडण्याचाही धोका आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात निसर्ग चक्र ीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या जोरदार पावसाने पाणी साचले होते. सरस्वती नाला येथे ओसंडून वाहतो आणि सराफ बाजार ते दहीपूल असा सर्व परिसर पाण्याखाली दरवर्षी जातो.पर्यायी मार्ग असा...मेनरोडवरील वंदे मातरम चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणाºया वाहनांनी थेट गाडगे महाराज पुतळामार्ग विजयानंद चित्रपटगृहासमोरून थेट साक्षी गणेश मंदिरामार्गे पुढे मार्गस्थ होतील. तसेच रविवार कारंजावरून खाली येत बोहरपट्टीकडे वळण घेत सराफ बाजारातून पुढे पर्यायी मार्गाने वाहनचालकांना जाता येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.एकीकडे लॉकडाऊन काळात व्यवासाय पूर्णत: ठप्प झाला होता. या रस्त्यांच्या कामामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे.
ऐन पावसाळ्यात ‘स्मार्ट’ खोळंबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 11:57 PM
स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील हा भाग आहे. तसेच पावसाळा सुरू झाला असताना या रस्त्याच्या विकासाचा घाट घातला जात आहे. स्मार्ट सीटीच्या कामाचा पूर्वानुभव बघता या ठिकाणी मोठा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत.
ठळक मुद्देवाहतूक वळविली : वर्दळीच्या भागात रस्त्याच्या कामाला प्रारंभ