शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 1:53 AM

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिककरांसाठी महत्त्वाची समस्या बनलेल्या पार्किं गच्या प्रश्नावर निर्णय झाला असून, शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंगचे नियोजनही यावेळी करण्यात आले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीची बैठक : शिवाजी स्टेडिअमच्या जागेत भुयारी वाहनतळाचा विचार स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांचा अभ्यास सुरू

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिककरांसाठी महत्त्वाची समस्या बनलेल्या पार्किं गच्या प्रश्नावर निर्णय झाला असून, शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंगचे नियोजनही यावेळी करण्यात आले.महापालिका क्षेत्रात वाहनतळाचा विषय गंभीर असून, या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात ३३ ठिकाणी पार्किंग होणार आहे. यातील २८ ठिकाणच्या आॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा करण्यात येणार आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा करण्यात येणार आहे. आॅफ स्ट्रिट असलेली सर्व वाहनतळे अत्याधुनिक आणि स्वयंचलित यंत्रणांनी परिपूर्ण असणार आहे. शहर परिसरात उपलब्ध जागांवर आधारित पार्किंगसाठी बी. डी. भालेकर मैदानाच्या जागेवर ३०२ वाहनांसाठी भुयारी वाहनतळ उभारण्यात येणार असून, यशवंत मंडई येथे २१२ वाहनांसाठी पूर्णत: स्वयंचलित असे बहुमजली पार्किंग तयार करण्यात येणार आहे, तर सीतागुंफे जवळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून २५२ वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी व त्या नियंत्रित करण्यासाठी समाधानकारक प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या इंस्पिरिया आणि ट्रिगिन या कंपन्या पात्र ठरल्याचेही स्मार्ट सिटीच्या बैठकीत समोर आले आहे.स्मार्ट सिटी तज्ज्ञ संचालकपदी भास्कर मुंढे संचालक मंडळ नियुक्तनाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनी संचालक मंडळाच्या बुधवारी (दि.११) झालेल्या सातव्या बैठकीत माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांची कंपनीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर, शाहू खैरे व गुरुमित बग्गा या महापालिका प्रतिनिधींची अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकसाठी काम करण्यास आवडेल : मुंढेउत्तर महाराष्टÑात तब्बल पंधरा वर्षे काम केल्याचा अनुभव असलेले माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांनी नाशिकसारख्या हवा, पाणी आणि सकारात्मक विचार तसेच रचनात्मक काम करण्यास पाठबळ देणाºया शहरासाठी काम करायला निश्चितच आवडेल, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. मुंढे यांची स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००३-०४ मध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी राबविलेला नद्या जोड प्रकल्प राबविल्याने राज्यात त्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनी त्यांच्या कार्याचा गौरवही केला होता. अमरावती आणि औरंगाबाद विभागाचे आयुक्त म्हणून काम करणारे मुंढे यांनी नाशिकला आदिवासी विकास आयुक्त म्हणूनदेखील काम केले आहे. कामगार कल्याण सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही मुंढे यांना शासनाने मानव मिशनचे आयुक्त म्हणून जबाबदारी दिली. सध्या केंद्र सरकारच्या वतीने दिल्ली- मुंबई कोरीडोर प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी स्थापन एसपीव्ही कंपनीचेदेखील ते संचालक आहेत. स्मार्ट कामे अशीतीन महिन्यांत सायकल शेअरिंगसार्वजनिक सायकल शेअरिंग योजनेअंतर्गत येत्या तीन महिन्यांत शहरातील विविध भागातील स्टॅण्डवर एक हजार सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ंमहाआयटीसाठी ४५ कोटीमहाआयटीच्या माध्यमातून शहरात ३११५ सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी ४५ कोटींचा वाटा शासनाला देणार आहे.ंदोन बहुमजली पार्किंगयशवंत मंडई आणि सीतागुंफा येथे मनपाच्या आरक्षित जागेवर दुमजली यांत्रिक पार्किंग उभारणार आहे.गावठाणासाठी ३१५ कोटीगावठाण भागाच्या विकासासाठी ३१५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. गावठाणामधे चोवीस तास पाणी, स्काडा मीटर बसविण्याचे नियोजन आहे.भुयारी पार्किंगसाठी नियोजनशिवाजी स्टेडिअमच्या जागेवरही काही वाहनांसाठी भुयारी वाहनतळाची सोय होऊ शकते का, याविषयीही स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांचा अभ्यास सुरू आहे.