नाशिक : शहरातील रस्त्यांवर वाहने उभी केल्यास तत्काळ शुल्क उभारणीसाठी तयारी करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने येत्या १ मार्चपासून काही भागात कार्यवाही सुरू करण्याचे ठरविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कंपनीच्या संचालकांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असला तरी तो जाहीर करण्यात आलेला नाही.शहरातील वाहनतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जटिल होत आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणे ए आर अंतर्गत खासगी विकासकांकडून विकसित करण्यात आले असले तरी त्याचा फायदा महापालिकेला होतच नसल्याचे दिसत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत आता महापालिकेने कंपनीमार्फत शहरात २८ ठिकाणी आॅनस्ट्रीट आणि पाच ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्किंग उभारले आहेत. त्यापैकी २८ आॅनस्ट्रीट पार्किंग सुरू करण्यावरून वादही झाले होते. अनेक शासकीय कार्यालये आणि बाजार किंवा अनेक अपार्टमेंट्ससमोर पट्टे आखून त्याठिकाणी स्मार्ट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अशाप्रकारे रस्त्यावर पार्किंग केल्यास वाहतूक पोलीस संबंधित वाहनचालकाला पार्किंग नसलेल्या ठिकाणी आणि विशेषत: वाहतुकीस अडथळा होईल, या नियमाखाली कारवाई करीत दंड वसूल करत असतात. परंतु आता स्मार्ट सिटी कंपनीने पीपीपी अंतर्गत प्रकल्प सुरू करताना अशाच रस्त्यांच्या कडेला पट्टे मारून बोर्ड लावले आहेत. एखाद्या दुकानात पाच मिनिटे जायचे तरी त्यासाठी कंपनीला पार्किंगचे पैसे द्यावे लागणार होते त्यामुळे अनेक भागात दुकानदारांनी विरोध केला आहे.
१ मार्चपासून सशुल्क स्मार्ट पार्किंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 11:55 PM
शहरातील रस्त्यांवर वाहने उभी केल्यास तत्काळ शुल्क उभारणीसाठी तयारी करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने येत्या १ मार्चपासून काही भागात कार्यवाही सुरू करण्याचे ठरविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कंपनीच्या संचालकांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असला तरी तो जाहीर करण्यात आलेला नाही.
ठळक मुद्देकंपनीची मंजुरी : पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता