नाशिक : एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कॅन्सर सुविधा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना इथेच अत्यंत माफक दरात उपचार मिळतील असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.धामणगाव मधील नंदी हिल्स येथे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रांगणात टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्या सहकार्यातून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा शुभारंभ झाला. यावेळी थोरात बोलत होते. याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आणि विश्वस्त डॉ. जयश्री थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.थोरात म्हणाले की, कोरोना महामारीने पुरेशा व दर्जेदार आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. फक्त मोठ्या शहरातल्या पंचतारांकित रूग्णालयांमध्येच चांगल्या आरोग्यसुविधा व उपचार मिळतात हा समज खोडून काढत एसएमबीटी रूग्णालय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात आरोग्य सेवा पुरवत असल्याचे गौरवोद्गार काढले. टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे तेथे लांबलचक प्रतीक्षा यादी असते व ती सतत वाढत राहते. संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रुग्णांची एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये देखील सोय उपलब्ध झाली आहे. या हॉस्पिटलचा व आमचा दृष्टिकोन व ध्येय एकच आहे. त्याचा लाभ रुग्णांना निश्चितच होईल, असेही त्यांनी सांगितले. एसएमबीटी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी प्रास्ताविक केले. डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले.मोफत बाह्यरुग्ण सेवा उपलब्धसध्या हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियलच्या सहकार्याने केमोथेरपी व शस्त्रक्रिया विभाग सुरू केला असून येत्या दीड वर्षांमध्ये कॅन्सर ह़ॉस्पिटलची स्वतंत्र अद्ययावत इमारत रुग्ण सेवेसाठी तयार होईल, असा विश्वास डॉ. हर्षल तांबे यांनी व्यक्त केला. सुरुवातीच्या टप्प्यात आठवड्यातून तीन दिवस कॅन्सर बाह्यरुग्ण सेवा मोफत उपलब्ध असणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध असणार आहे.
टाटा मेमोरियलसोबत एसएमबीटीचा सहयोग करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:02 PM
नाशिक : एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कॅन्सर सुविधा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना इथेच अत्यंत माफक दरात उपचार मिळतील असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देकॅन्सर रुग्णांसाठी एकत्र : थोरात यांच्या हस्ते शुभारंभ