घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील घाटनदेवी शिवारात जिल्हाबंदी चौकशी सुरू असताना नाकाबंदीमध्ये तपासात २ इसम विनानंबर प्लेटची गाडी घेऊन जात असताना हटकले असता, ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या ताब्यात येताच त्याच चोरट्यांनी तपासात विविध चोरींची कबुली दिली.इगतपुरी पोलीस ठाण्यात २ दुचाकी चोरीच्या तक्रारी आल्या असता त्याचा शोध सुरू होता. चोरट्यांनी एका गुन्ह्यापाठोपाठ इगतपुरी व मुरबाड येथून सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.जिल्हाबंदी तपासणीदरम्यान घाटनदेवी येथे नाकाबंदीच्या वेळी नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल घेऊन जात असताना दोन इसम आढळले. मोटारसायकल आरोपी मयूर विसे, महेश खापरे, रा. मुरबाड यांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तपासात चोरट्यांनी ६ मोटारसायकली इगतपुरी, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथून चोरी केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून आणखी वाहन चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे, दीपक पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र गांगुर्डे, मुकेश महिरे करीत आहेत.चोरट्यांनी इगतपुरी शहरातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भागातून अशा विविध ठिकाणांहून दुचाकी गाड्या चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याचा धागा पकडून तपासाची गती वाढवीत मोटारसायकल चोराच्या मुसक्या आवळल्याने ही टोळी उजेडात आली. या टोळीकडून आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.- समाधान नागरे, पोलीस निरीक्षक, इगतपुरी.
मोटारसायकल चोराच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:22 PM
घोटी : इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील घाटनदेवी शिवारात जिल्हाबंदी चौकशी सुरू असताना नाकाबंदीमध्ये तपासात २ इसम विनानंबर प्लेटची गाडी घेऊन जात असताना हटकले असता, ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या ताब्यात येताच त्याच चोरट्यांनी तपासात विविध चोरींची कबुली दिली.
ठळक मुद्देसहा गुन्ह्यांची उकल : इगतपुरीसह ठाणे जिल्ह्यातील प्रकार