अशोक बिदरी
मनमाड (नाशिक) - मनमाडहून नाशिककडे जाणाऱ्या नांदेड - मुंबई हॉलिडे एक्सप्रेस प्रवासी गाडीच्या खालून धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या गाडीला उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आले.रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर निरोधक यंत्रणा कार्यान्वीत केली. परंतु झालेल्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गाडीचे एस ३ आणि एस ४ या दोन्ही बोग्यांच्या लायनिंग वायरमध्ये बिघाडा झाल्याने धूर निघत असल्याचे समजते. दरम्यान ही गाडी मनमाड रेल्वे स्थानक सुटल्यानंतरच काहीतरी जळण्याचा वास प्रवाशांना येत असल्याचे म्हणणे आहे.