नाशिक : नवरात्रोत्सवाचे अखेरच्या दोन दिवसांत रात्री बारा वाजेपर्र्यंत दांडिया खेळण्याला परवानगी दिल्याने पहिल्याच दिवशी दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. वाद्य वाजविण्यास दहा वाजेची वेळ कमी पडत असल्याची तक्रार नवरात्रोत्सव मंडळांकडून केली जात होती. पोलीस प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांच्या भावनेचा आदर करीत रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी दिली असली तरी दांडियाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. इंदिरानगरला नवरात्रोत्सवाची रंगतइंदिरानगर : शांताबाई, अगं शांताबाई, ढोली तारोसह विविध लोकप्रिय गीते आणि आॅर्केस्ट्राच्या तालावर परिसरातील नवरात्रोत्सव मंडळात तरुणाई थिरकत आहेत.शनिवारी पाचवी माळ आणि रविवारी सहावी माळ असल्याने राजीवनगर, संताजीनगर, पांडवनगरी, चेतनानगर, वासननगरसह परिसरातील नवरात्रोत्सवाची रंगत वाढली आहे. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने युवक, युवती आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दांडिया रासचा आनंद घेत आहेत.राजीवनगर येथील युनिक ग्रुपच्या वतीने परिसरात प्रथमच युवती व महिलांसाठी स्वतंत्र दांडिया रासचे आयोजन करण्यात आल्याने टवाळखोरांच्या त्रासास कंटाळून बाहेर न निघणाऱ्या युवती व महिलाही मोठ्या प्रमाणात बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे दांडिया रासला युवती आणि महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. दररोज दहा भेटवस्तू, स्मृतिचिन्ह आणि चार पैठणी बक्षीस देण्यात येत आहे.संताजीनगर येथील गणेश युवा मित्रमंडळाच्या वतीने दररोज ११०० रुपये बक्षीस आणि प्रथम एलसीडी, द्वितीय वॉशिंग मशीन, तृतीय फ्रीज आदि बक्षिसांची लयलूट असल्याने परिसरात एकमेव दांडियाचे आयोजन असल्याने आबालवृद्धाची गर्दी आहे.चेतनानगर येथील सह्याद्री युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दांडिया रासमध्ये लहान बालकांना भेटवस्तू तर मोठ्यांना नामांकित हॉटेलमध्ये दोघा जणांस जेवणाचे कूपन देण्यात येत आहे. तसेच बाजीराव फाउंडेशनच्या वतीने दररोज वेशभूषा, उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना बक्षिसे देण्यात येत आहे. लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था वासननगर, पांडवनगरी येथील नवदुर्गा मित्रमंडळसह परिसरातील लहान-मोठ्या नवरात्रोत्सव व मंडळास दांडियाप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी रात्री दांडीया खेळणाऱ्यांची संख्या वाढली होती.
बारा वाजेपर्यंत धूम
By admin | Published: October 20, 2015 11:50 PM