लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनानिमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. सकाळी काळाराम मंदिर, सीतगुंफा, रामकुंड या भागात पंचवटी पोलिसांसह जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी संचलन केले. यावेळी पोलिसांकडून ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या.राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने शहरातील रामकुंडावर आरतीसह विविध मंदिरांमध्ये छोटेखानी धार्मिक कार्यक्रम मोजकेच पुजारी, विश्वस्तांच्या उपस्थितीत आटोपशीर घेण्यात आले. ठिकठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मात्र, कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येपासूनच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्वच परिस्थितीचा आढावा घेत बंदोबस्ताची आखणी करत उपायुक्त, सहायक आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर, म्हसरूळ, आडगाव, गंगापूर, उपनगर अशा सर्वच पोलीस ठाणे हद्दीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अनेक रस्त्यांवर पोलीसबुधवारी रामकुंडाकडे येणारे रस्ते मालेगाव स्टॅण्ड, गणेशवाडी, दिल्ली दरवाजा, रविवार कारंजा, गणेशवाडी येथून बंद ठेवण्यात आले होते. तसेच काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर, कपालेश्वर मंदिरासह आदी ठिकाणांच्या राममंदिर, हनुमान मंदिरांभोवती बॅरिकेडिंग करत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरांमध्ये नियमित पूजाविधी करणाऱ्या पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला गेला. रामकुंडावर दशक्रियाविधीसाठी आलेल्या नागरिकांचा अपवाद वगळता अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.शहर व परिसरात सर्वत्र शांततेत भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव पार पडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
बंदोबस्त आणि निर्विघ्न सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 12:14 AM
नाशिक : अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनानिमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. सकाळी काळाराम मंदिर, सीतगुंफा, रामकुंड या भागात पंचवटी पोलिसांसह जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी संचलन केले. यावेळी पोलिसांकडून ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या.
ठळक मुद्देशातंता : कोरोनामुळे नियमांचे पालन करूनच विधी