शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

स्त्रियांच्याच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यात ‘स्मृतिचित्रे’ला मोलाचे स्थान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:11 AM

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर ...

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर एकूण मराठी साहित्यात मोलाचे स्थान असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ पगार यांनी नमूद केले.

सावानाच्या वतीने आयोजित शब्दजागरमध्ये लक्ष्मीबाई टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिचित्रे’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पारंपरिक रीतिरिवाजात वाढलेल्या लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव मनकर्णिका गोखले होते. त्यांचे लग्न त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. घरातील रूढी, परंपरा, चालीरीतींचा पगडा लक्ष्मीबाईंवर बालपणापासूनच होता. त्यामुळे त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. लग्न झाल्यावर नारायण टिळकांनी त्यांना जमेल त्या वेळेत स्वत: शिक्षण दिले. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात त्यांनी या त्यांच्यावर झालेल्या ख्रिश्चन प्रभावाचे वर्णन केले आहे. नारायणराव टिळक हे सदसद्विवेकी बुद्धिवादी आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा प्रभाव लक्ष्मीबाई टिळक यांच्यावर लवकरच पडला. ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. त्यांचे पती रेव्ह. ना.वा. टिळक व त्या स्वत: ख्रिस्ती कशा झाल्या याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात, जातीव्यवस्था, धार्मिक विद्वेष, विचारस्वातंत्र्यावर असलेली बंधने, यांचे वर्णन आले आहे. ८ जुलै, १९०० रोजी लक्ष्मीबाईंचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश झाला. त्याशिवायही त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वस्तुसंग्रहालय बी.जी. वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहायक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

इन्फो

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. माणसा-माणसांत भेदभाव करण्याची दुष्ट प्रवृत्ती मनातून समूळ नाहीशी होणं हे खरं धर्मांतर. त्यानंतर, तुम्ही कोणत्या लौकिक धर्माचा स्वीकार करता ते गौण आहे. जाती-धर्माची नव्हे, तर देवाची लेकरं व्हा, हेच स्मृतिचित्रेचे सार असल्याचे पगार यांनी नमूद केले.