नाशिक : शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावर असलेल्या पुरातन वटवृक्षांपैकी दोन वटवृक्षांची अज्ञात लाकूड तस्करांकडून कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ईदगाह समितीसह महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अनभिज्ञ आहे. ईदगाहच्या वास्तूएवढेच जुने वटवृक्ष या वास्तूभोवती दिमाखात उभे होते. त्यापैकी केवळ शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने असलेला एकमेव वटवृक्ष या वास्तूचा साक्षीदार म्हणून अस्तित्वात राहिला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने असलेल्या दोन वटवृक्ष नाहीसे झाले आहेत. या वटवृक्षांवर अज्ञात इसमांनी इलेक्ट्रॉनिक कटर चालवून कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडप्रजातीवर कुºहाड चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. अडथळा जरी असेल तरी न्यायालयाच्या परवानगीशिवाय वड प्रजातीवर कुºहाड चालविता येत नाही. एकूणच न्यायालयाने वड प्रजातीच्या भारतीय वृक्षांना अभय दिले आहे. तसेच वृक्ष संवर्धन-संरक्षण अधिनियमानुसारही विनापरवानगी झाडे तोडणे गुन्हा आहे. एकूणच पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची असून, त्यामुळे कायद्याने झाडांना संरक्षण प्रदान करण्यात आले आहे; मात्र लाकूड तस्करांकडून कायद्याचा भंग करीत शासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करून झाडे तोडण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या ईदगाह मैदानावरील वास्तूभोवतालची दोन वटवृक्ष कटरच्या सहाय्याने कापून विल्हेवाट लावण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ही झाडे शेकडो वर्षे जुनी होती. सध्या येथे असलेल्या एका वटवृक्षाप्रमाणेच इतर दोन वृक्ष बहरलेले होते. या वृक्षावरून त्या वृक्षांचा सहज अंदाज लावता येणे शक्य आहे; मात्र ही डौलदार झाडे कोणी कापून नेली याचा कुठलाही थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही.
तस्करांनी चालविला ‘कटर’ : मनपाच्या उद्यान विभागासह वृक्षप्राधिकरण समिती अनभिज्ञ ‘ईदगाह’वरील वटवृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:09 AM
नाशिक : शहाजहांनी ईदगाह मैदानावर असलेल्या पुरातन वटवृक्षांपैकी दोन वटवृक्षांची अज्ञात लाकूड तस्करांकडून कत्तल करण्यात आली आहे.
ठळक मुद्देएकमेव वटवृक्ष या वास्तूचा साक्षीदार म्हणून अस्तित्वातसंवर्धनासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची