शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नाशिकमध्ये घोरपडीची ७८१ लिंगे अन् २० किलो इंद्रजालची तस्करी रोखली; ' डीआरआय'चा सापळा

By अझहर शेख | Published: April 14, 2024 10:09 PM

नाशिक : जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात घोरपडीची लिंग व इंद्रजालची तस्करी होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या ...

नाशिक : जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात घोरपडीची लिंग व इंद्रजालची तस्करी होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या अखत्यारीतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला मिळाली होती. पथकाने शनिवारी (दि.१३) मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून एका संशयिताला अस्वलदरा भागातून जाळ्यात घेतले. यावेळी एक संशयित आरोपी निसटून जाण्यास यशस्वी ठरला तर दुसऱ्याच्या ताब्यातून घोरपडीचे ७८१ लिंगे व २० किलो इंद्रजाल जप्त करण्यात आले आहे. आदेश खत्री पवार (रा.अस्वलदरा, नांदगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी सुनावली.

भारत सरकारच्या अखत्यारीतील गोपनीयरीत्या तस्करीविरोधी कार्यरत असलेली गुप्तचर संस्था असलेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय केंद्राच्या अधिकाऱ्यांना नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यानुसार शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निखिल सावंत यांच्या पथकाने अस्वलदरा भागात छापा टाकून पवार यास ताब्यात घेतले. यावेळी आदेश खत्रीचा साथीदार पळून गेला. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत अनुसूची-१मध्ये संरक्षित असलेल्या घोरपड या वन्यप्राण्याची सुमारे ७८१ लिंग (हत्था जोडी) तसेच सागरी जीव असलेले इंद्रजाल (सी फॅन, सी कोरल्स) साधारणत: २० किलो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ३० लाख रुपये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) विशाल माळी यांना माहिती कळविण्यात आली. तातडीने प्रभारी सहायक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे, नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वनपथकाने मुद्देमालाची पडताळणी केली असता प्रथमदर्शनी जप्त केलेले घोरपडीचे लिंग व इंद्रजाल अस्सल असल्याची खात्री पटविली. डीआरआयच्या पथकाकडून मुद्देमालासह संशयित आरोपी आदेश खत्री यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत वन्यप्राणी अवयवांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास ढोले हे करीत आहेत.

गुरुवारपर्यंत आरोपीला वनकोठडी

संशयित आरोपी आदेश पवार यास नांदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात रविवारी (दि.१४) नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पवार यास गुरुवारपर्यंत (दि.१८) वनकोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी