पेठ : महाराष्ट्र व गुजरात सीमारेषेवरील दुर्गम अशा देवडोंगरी गावाजवळ खैर वृक्षाची अवैध कत्तल करून तस्करीच्या उद्देशाने वाहतूक करतांनाचे वाहन वनविभागाच्या गस्ती पथकाने संशयावरून अडवले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी वाहन सोडून पलायन केले.हरसुल व पेठच्या जंगलातून रात्रीचे वेळी हरसूल रेंजचे वनक्षेत्रपाल के. व्ही. सूर्यवंशी, के.एस. एकशिंगे, वनरक्षक एन.एस.पाटील, एम.एस. परडे , आनंदा पवार व वनमजूर रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना रस्त्यावर आयशर कंपनीचा टेम्पो आढळून आला . गस्ती पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार झाले . वाहनाची तपासणी केली असता त्यात बेकायदा कत्तल केलेले खैर वृक्षाचे ओंडके आढळून आले. मालाचे मोजमाप केले असता ०.८१ घनमीटर व त्याचे मुल्य ९८०० रुपये आणि वाहनाचे मूल्य १ लाख ९० हजार रूपये असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .विभागीय व्यवस्थापक यु.सी. ढगे, सहाय्यकव्यवस्थापक एस.एच.वाजे यांचे मार्गदर्शनाखाली बोरीपाडाचे वनक्षेत्रपाल सी.आर.ढोबळ , झरी वनक्षेत्राचे एम.पी.जोशी, वनमजूर यांनीही सहकार्य केल्याने मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .
गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 6:30 PM
कारवाई : तस्करांकडून मुद्देमालासह वाहन जप्त
ठळक मुद्दे गस्ती पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार झाले .