अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. कोरोना संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठरावीक वेळेपुरतेच काम करतात.शुक्रवारी (दि.१७) दादा वाघ रा. पिंप्री (माळेगाव) ता. त्र्यंबकेश्वर हे आपल्या उंबरविहीर शेतशिवारात काम करीत असताना एका मोकळ्या जागेत सुमारे १० ते १२ फूट लांबीचे धामण जातीच्या सापांची जुळण दिसली. यावेळी सुरुवातीला दादा वाघ या शेतकऱ्याच्या अंगावर काटे उभे राहिले.सध्या कोरोना व्हायरस या महामारीने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीलाही यामुळे फटका बसला आहे. शेतातील पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतात राबराब राबून बिगर कोरोनाने का मरावे असा सवाल शेतकºयांच्या मनात येत आहे. माणसाने आजपर्यंत निसर्गाचा उपयोग स्वार्थापोटीच केलेला आहे.आज एका सूक्ष्म कोरोना विषाणूला हरवण्याचे कोणतेही ठोस शस्त्र माणसाकडे नसल्यामुळे जीव वाचवण्यासाठी घरात दडून बसावे लागले आहे. याउलट निसर्गातील जैवविविधता मोकळेपणानेनिसर्गाच्या अंगणात मुक्तपणे खेळताना, संचार करताना दिसून येत आहे. यात पशू-पक्षी-प्राणी-जलचर-उभयचर हे सर्वच मुक्त वावरताना दिसत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना घरात दडून बसण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता माणसानेच माणसावर ही वेळ ओढवून आणली आहे. कारण माणसाने वर्षानुवर्षे निसर्गात अनाठायी व अविवेकी हस्तक्षेप केला आहे. त्याचे अनेक पर्यायी परिणाम भोगण्याची वेळ मानव जातीवर येत आहे.
उंबरविहीर शेतशिवारात सापांची जुळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:13 AM