शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महागड्या मोबाइलवर चोरट्यांची नजर

By admin | Published: December 12, 2015 12:04 AM

दोन घटना : रस्त्याने बोलणाऱ्यांचे हिसकाविले मोबाइल

नाशिक : रस्त्यावर चालताना मोबाइलवर बोलणे नागरिकांना आता चांगलेच महागात पडणार आहे़ याचे कारण म्हणजे महिलांच्या सोनसाखळी खेचणाऱ्या चोरट्यांनी आता महागड्या मोबाइलवर लक्ष केंद्रित केल्याचे गत दोन दिवसांत गंगापूर व पंचवटी पोलीस ठाण्यातील घटनांवरून दिसून येते़ त्यामुळे महागडे मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून चालताना मोबाइलवर बोलताना सतर्क राहावे लागणार आहे़पंचवटीतील कलानगरमध्ये राहणारा अभिजित राजेंद्र साबळे हा गुरुवारी (दि़ १०) सकाळी सात वाजेच्या सुमारास परिसरातून पायी जात होता़ त्यावेळी मोबाइलवर फोन आल्याने तो बोलत-बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्याच्याकडील २७ हजार ५०० रुपयांचा मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवर घडली होती़ विसेमळा येथील रहिवासी अभय पांढारकर हे कॉलेजरोडने पायी जात असताना फोन आल्याने ते मोबाइलवर बोलत जात होते़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यांचा मोबाइल खेचून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)