पाटणे : येथील दोन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील एकूण बाधितांची संख्या ३४वर पोहोचली आहे. त्यापैकी १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २४ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.गुुरुवारी ६३ वर्षीय पुरुष व ६८ वर्र्षीच महिला बाधित आढळून आल्याने त्यांना मालेगाव येथील सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यसेविका सुरेखा देवरे यांनी दिली. पाटणे येथे दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या निश्चितच धोकादायक ठरू पहात आहे. संसर्ग साखळी तोडण्याचा दृष्टिकोनातून पाटणे ग्रामपंचायतीने ३० आॅगस्ट २०२० पर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी आपल्या शेजारचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास संसर्ग रोखता येईल. ज्या व्यक्तीला क्वॉरण्टाइन केले असेल त्यांच्याविषयी चांगल्या भावना ठेवून संबंधित व्यक्तीविषयी सहानुभूती दाखवा. तसेच सोशल डिस्टन्सिंग बाळगणे, मास्क वापरणे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केल्यास गाव कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते निंबा बच्छाव यांनी सांगून शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पाटणे येथे आतापर्यंत २४ जणांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:10 PM