नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेल्या बसेस अजूनही दोन-चार प्रवासी असले तरी त्यांना इच्छितस्थळी पोहोचवत आहे.परप्रांतीय प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. परराज्यातील सीमा आणि रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना सोडण्याठी विशेष बाब म्हणून या बसेस धावल्या होत्या. जिल्ह्यातील नागरिकांसाठीदेखील जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्याची मागणी होऊ लागल्याने शासनाच्या आदेशानुसार गेल्या २२ मेपासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील दहा आगारांमधून जिल्हांतर्गत बससेवेला सुुरुवात झाली.गेल्या २२ मे ते ९ जून या कालावधीत महामंडळाच्या बसेसने ४५३ फेऱ्या करून ५७२६ प्रवाशाांची वाहतूक केली. या माध्यमातून महामंडळाला १ लाख १६ हजार इतकेच उत्पन्न मिळाले आहे. परंतु उत्पन्न मिळविणे हा उद्देश नसून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसºया टप्प्यातील लॉकडाऊननंतर आता प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागलेली आहे. फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर तसेच संपूर्ण बस सॅनिटाइझ करून सोडली जात आहे.-------------------------------------अजूनही प्रवाशांची प्रतीक्षागेल्या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्हांतर्गत दहा आगारांमधून बससेवासुरू झाली असून, आणखी काही ठिकाणाहून बस सुरू होणार आहेत. बसेस सुरू झाल्या असल्या तरी कोरानाच्या प्रभावामुळे तसेच नागरिक घराबाहेर पडत नसल्याने बसेसेला प्रवासीदेखील मिळाले नाही. पहिल्या दिवशी तर अगदीएक आणि दोन प्रवाशांना घेऊन बसेस धावल्या. सुरगाणा,पेठ मार्गावर मात्र बसेसेला मिळणारा प्रतिसाद आजही कायम आहे. इतरत्र मात्र अजूनहीअपेक्षित प्रवासी मिळत नसले तरी बसेस मात्र कायम आहेत.
आतापर्यंत ५७०० प्रवाशांचा बसने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:40 PM