नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे विभागातून अध्यक्षपदासाठी जगविख्यात खगोल संशोधक आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे नारळीकर यांच्या नावावर सहमती झाल्यास आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिला विज्ञान कथालेखक आणि संशोधकाला संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळू शकणार आहे.
संमेलनाच्या इतिहासातील गत ९४ वर्षात न झालेली म्हणजे विज्ञान कथालेखकाला कधीही अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही. मात्र, डॉ. नारळीकर यांनी विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी बजावून विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातही मराठी भाषेतून जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, असे कार्य केले आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाने जर त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर एका संशोधक विज्ञान लेखकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळेल. संमेलनाच्या इतिहासात शंभर वर्षात न झालेली गोष्ट घडेल आणि ती म्हणजे विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी बजावून विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातही मराठी भाषेतून जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, असे कार्य केलेल्या एका संशोधक लेखकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळेल. मात्र, नारळीकर यांच्यासारख्या तत्त्वनिष्ठ संशोधक व्यक्तीला साहित्य संमेलनातील अघळपघळपणा तसेच साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नारळीकर यांचा स्पष्टवक्तेपणा कितपत पचनी पडेल, हा प्रश्नच आहे. तसेच संमेलनाध्यक्षाने बौद्धिक, वैचारिक अधिष्ठान देण्यापेक्षा तिन्ही दिवस मिरवणे तसेच वर्षभरदेखील राज्यभर हिंडत सत्कार-सोहळे स्वीकारणे नारळीकर यांच्या शारीरिक प्रकृतीला आणि मनोधर्माला सोसणारे नसल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत दिसून येणारे आहे.
इन्फो
बौद्धिक व्याख्यानातच रस
निव्वळ सत्कार समारंभ किंवा पुरस्कार वितरण अशा कार्यक्रमांची निमंत्रणे स्वीकारण्याचा नारळीकर यांचा फारसा स्वभाव नाही. किंबहुना त्याऐवजी ते आयोजकांना व्याख्यानाला बोलावल्यास येईन, असे स्पष्टपणे सांगत असत. सत्कार किंवा समारंभांना सामान्य नागरिकांचा विचार ऐकून घेण्याची मानसिकता नसते. त्यापेक्षा व्याख्यानांना येणारा नागरिक हा विज्ञानविषयक विचार ऐकून घेण्याच्या मानसिकतेत रहात असल्याने त्यामुळे विज्ञानप्रसार होईल, ही भूमिका नारळीकर त्यांनी आयुष्यभर जपली असल्याने त्यांच्या तत्त्वाला ते कितपत मुरड घालतील आणि महामंडळालादेखील त्यांची विज्ञाननिष्ठ दृष्टी झेपेल का, हा प्रश्नच आहे.
फोटो
साहित्य संमेलनाचा लोगो आणि
२० नारळीकर फोटो वापरावा.