नाशिक : कोरोनामुळे देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करणारी जवळपास दहा हजार वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात उभी करून निषेध आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेने दिला आहे.नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे यांच्यासह उपाध्यक्ष योगेश दुसाने व सचिव अजय खर्रा यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयास इशारा दिला आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकाडाऊन घोषित केले. या काळात व्यवसाय बंद असल्याने व्यावसयिकांसोबतच या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या ५० हजार लोकांच्या रोजगारावर गंडांतर आले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास दहा हजार प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत, तर या व्यवसायावर सुमारे ४ ते ५ लाख लोक अवलंबून आहेत. या सर्वांचीच प्रवासी वाहतूक बंद असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहतूकदार संघटनेला व्यवसायास परवानगी देण्यात यावी याप्रमुख मागणीसह वाहतूकदारांनी सरकारने वातूकदारांना एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करावा, विमा कालावधी वाढवून द्यावा, मोरॅटोरिअम योजनेतील व्याज अवाजवी असून, किमान सहा महिने व्याज व त्यावर हप्ता आकारण्यात येऊ नये, पेट्रोल डिझेलवरील अधिभार रद्द करावा, ५० टक्के प्रवासी वाहतूक करण्याचा नियम करण्यात येत असल्याने ५० टक्केच रोड टॅक्स आकारण्यात यावा, चालक व वाहकांना कोविड विमा संरक्षण देण्यात यावे आदी विविध मागण्या नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.
...तर वाहने आरटीओ कार्यालयात जमा करू ; प्रवासी वाहतूकदार संघटनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 5:47 PM
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्रवासी वाहतुकीस परवानगी द्यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करणारी जवळपास दहा हजार वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात उभी करून निषेध आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेने दिला आहे.
ठळक मुद्देप्रवाशी वाहतूकदार संघटनेचा आक्रमक पवित्राव्यावसायास परवानगी द्या अन्यता आंदोलन