शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

..तर रोज नऊशे इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:19 PM

नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे तीन संस्था आणि दीड लाख घरे किंवा इमारती याचे गुणोत्तर काढले तर एकेका दिवसात तब्बल नऊशे मिळकतींचे आॅडीट करावे लागणार आहे.

ठळक मुद्दे जुन्या इमारतींचा प्रश्न : तीनच प्राधिकृत संस्था असल्याने काम अपूर्णच राहणार

नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे तीन संस्था आणि दीड लाख घरे किंवा इमारती याचे गुणोत्तर काढले तर एकेका दिवसात तब्बल नऊशे मिळकतींचे आॅडीट करावे लागणार आहे. त्यानंतरही सर्व इमारतींचे आॅडीट होणे जवळपास अशक्यच असल्याचे दिसते आहे. गोदाकाठी वसलेले गाव असल्याने गावठाण भागात पन्नास- शंभर दीडशे वर्षांचे आयुर्मान असलेले वाडे आहेत. महापालिका स्थापन होताना आणखी २३ गावठाण एकत्र आल्याने तेथे देखील जुने वाडे आहेत. दरम्यान, असे वाडे वगळता देखील ज्या इमारती किंवा घरे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने घरे आहेत,त्याची संख्या ही अधिक आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुदसार शहरात एकुण ४ लाख ७९ हजार ६०० मिळकती आहेत. त्यातील १लाख ५७ हजार ३५७ इमारती तीस वर्षांपेक्षाअधिक काळापेक्षा जुन्या आहेत. नियमानुसार अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट होणे गरजेचे आहे. विशेषत: लोड बेअरींगच्या जुन्या घरांचे अशाप्रकारचे आॅडीट होणे आवश्यक आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी स्ट्रक्चरलआॅडीटसाठी संस्था नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार मविप्र,संदीप फाऊंडेशन आणि एका खासगी कंपनीला स्ट्रक्चरल आॅडीटचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. या संस्थांनी स्ट्रक्चरल आॅडीट केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करायचे आहे. तसेच या प्राधीकृत संस्थांच्या सूचनेनुसार वास्तुत दुरूस्ती अथवा अन्य बदल करणे आवश्यक आहे. तथापि, १ लाख ५७ हजार घरे आणि स्ट्रक्चरल आॅडीटसाठी अवघ्या तीन संस्था यांचा विचार केला तर वर्षभर अगदी रोज हे काम करायचे तरी ९०० इमारतींना रोज भेट द्यावी लागेल आणि एकाच दिवशी ९०० घरांना भेट देणे या तीन्ही प्राधीकृत संस्थांना तरी शक्य होईल काय असा प्रश्न केला जात आहे. मुळातच महापालिकेने संख्या वाढविण्याची गरज आहे. काय असते स्ट्रक्चरल आॅडीट ?इमारत कितपत टिकू शकेल आणि भार सहन करू शकेल यासाठी स्ट्रक्चरल आॅडीट केले जाते. बांधकाम करताना देखील स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. जुन्या मिळकतींची मजबुती तपासण्यासाठी व्हिज्युएल इन्स्पेक्शन, हॅमर टेस्ट आणि कोअर टेस्ट केली जाते. त्या आधारे आयुर्मान काढले जाते.शहरातील दीड लाखाहून अधिक इमारतींचे केवळ तीन संस्थांमार्फत स्ट्रक्चरल आॅडीट करणे व्यवहारीक दृष्टया शक्य नाही. मेरी सारख्या सरकारी संस्था तसेच अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आणि खासगी लॅब्ज उपलब्ध आहे. त्यांना संधी दिल्यास स्ट्रक्चरल आॅडीटचे काम पुढे जाऊ शकेल.- अरूण काबरे, वास्तुविशारद, नाशिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर