नाशिक शहरातील चांगले रस्ते खोदण्याचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडकडून सुरू आहे. एमजी रोड येथील एकही खड्डा नसलेला रस्ता गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांच्या नावाखाली खोदण्यात आला असून, गेल्या आठवड्याभरापासून त्याचे काम थांबल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे. गंगाघाटशेजारील रस्ता पावसाळी गटार व पाईपलाईनकरिता खोदण्यात आला होता. या रस्त्याकरिता आठ महिन्यांहून अधिक कालावधी लागला. रस्ता सद्यस्थितीत मुरूम टाकून बुजविण्यात आला असून पावसामुळे या परिसरात चिखल साचला आहे. गंगाघाट परिसर भाविकांनी गजबजलेला असल्याने विकासकामांच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे भाविकांची गैरसोय होत आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी विकासकामांच्या नावाखाली खोदण्यात आलेले रस्त्यांचे काम तातडीने करण्यात येऊन रस्ते पूर्ववत करावे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील एकही काम होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, बाळा निगळ, सागर बेदरकर, नीलेश भंदुरे, गणेश पवार, कल्पेश कांडेकर, नवराज रामराजे, किरण पानकर, राहुल पाठक, भालचंद्र भुजबळ, अथर्व खांदवे, तेजस शिंदे, ओमकार बेंद्रे, निरंजन पगार, दीपक कुलकर्णी, गणेश गरगटे, प्रणव पानकर, कुणाल घसते, बाळू फसटे, नीरज काळे आदी उपस्थित होते.
(फोटो २१ एनसीपी)