नाशिक : हुंडाबळी, स्त्री-भ्रृण हत्या, शेतकरी आत्महत्या, मोबाईल- सोशल मीडीयाचे व्यसन, मद्याचे व्यसन, प्लास्टीकबंदी, भ्रष्टाचार या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर पथनाट्याद्वारे प्रकाशझोत टाकून कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले़ निमित्त होते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ऩब़ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे शनिवारी (दि़५) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचे़ या स्पर्धेत व्ही़एऩनाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने प्रथम पारितोषिक पटकावले़
समाजात आजही मोठ्या प्रमाणावर कायद्याविषयी अनभिज्ञता असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच विधी महाविद्यालये कायद्यांविषयीची जनजागृती करण्याचे मोलाचे काम करतात़ ठाकूर विधी महाविद्यालयाने इतर माध्यमांप्रमाणेच पथनाट्याद्वारे सामाजिक व कायदेशीर जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते़ या स्पर्धेत १३ महाविद्यालयांनी सहभाग घेऊन हुंडाबळीपासून तर सोशल मीडीया, शेतकरी आत्महत्या यासारख्या विविध सामाजिक विषयांवर भाष्य करून पथनाट्याद्वारे कायदेविषयक जनजागृती केली़
ठाकूर विधी महाविद्यालयात झालेल्या या पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या व्हि़एऩनाईक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ़ राम कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व १००१ रुपये देऊन सत्कार करण्यात आला़ माजी जिल्हा न्यायाधीश आऱआरक़दम, प्राचार्य डॉ़अस्मिता वैद्य, दीपाली खेडकर, प्रा़डॉ़ संजय मांडवकर यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक मिळविणारे मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालय तर तृतीय क्रमांक मिळविणारे नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच उत्कृष्ठ विद्यार्थी व विद्यार्थिनी पात्रांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले़
प्रा़डॉ़भरत कौराणी व प्रा़वृषाली थोरात हे पथनाट्य स्पर्धेचे समन्वयक होते़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी व श्रेयर मोहरीर यांनी केले तर विद्यार्थी प्रतिनिधी महेश गायकवाड याने आभार मानले़