नाशिक : संचारबंदीच्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात त्यांनी बॅँकांसाठी नियमावलीच तयार केली असून, त्यात अनेक प्रकारच्या स्वच्छता सेवा सक्तीच्या केल्या आहेत.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकारचे उपाय केले असून, सध्या नाशिक जिल्ह्णात संचारबंदी सुरू आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू असून, त्यात किराणा दुकाने, औषधालये, बॅँका आणि पेट्रोलपंपांचा समावेश आहे. बॅँकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निर्बंध लागू केले असून, त्याअंतर्गत एकावेळी बॅँकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काउंटरसमोरदेखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील, असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतरदेखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बॅँकेसाठी नियमावलीच तयार केली आहे.ज्या बँक व एटीएममध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजनानुसार बँकांनी कामाचे तास व वेळ याबाबत नियोजन करावे. तसेच आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे नियमच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहेत.बँका आणि एटीएममध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व बँकांनी आपल्या बँकांचा व एटीएमच्या दर्शनी भागावर दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्र मांक व व्हॉट्सअॅप क्रमांक ठळक जागी लावावेत. तसेच प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामासिक अंतर ठेवून बँक व एटीएममध्ये व बाहेर मार्किंग करावे. बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हँडग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
बॅँकांमध्येही आता सोशल डिस्टन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:16 AM
संचारबंदीच्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे.
ठळक मुद्देमनपाची नियमावली : एटीएममध्ये सॅनिटायझर सक्तीचे