शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

विवाहाच्या आमंत्रणासाठी हवे सोशल मीडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:55 AM

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़

नाशिक : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़  सोशल मीडियावरील या चळवळीबाबत ‘लोकमत’ने केलेल्या या वृत्ताचे वाचकांनी समर्थन केले आहे़ विवाहपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यासारख्या पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिकतेची कास धरण्याची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे़  तुलसीविवाहानंतर विवाह सोहळे सुरू होत असले तरी विवाहांची सर्वाधिक संख्या ही उन्हाळ्याच्या सुटीतच असते़ मुलांच्या परीक्षा, सुट्या या सर्वांचा विचार करून उन्हाळ्यात विवाह समारंभाचे आयोजन केले जाते़ उन्हाचा कडाका, दूर अंतरावरील नातेवाईक, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण यामुळे पत्रिका वाटप करणारे वर-वधूचे कुटुंबीय हैराण होतात़पूर्वी सोशल मीडिया वा मोबाइलसारखी साधने नव्हती, त्यामुळे पत्रिका छापणे आमंत्रण देणे हे अपरिहार्य होते़ मात्र आता काळ बदलला आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया वेगवान झाले आहेत. एका मिनिटात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते़ मुलाच्या विवाहासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता व आमंत्रणाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुरू करावी यासाठी केवळ देवी-देवता, मंदिर व विवाहाचे प्रमाणपत्र यासाठी केवळ अकरा पत्रिका छापल्या़ उर्वरित अग्रवाल समाजातील सर्व नातेवाइकांचा ग्रुप तयार करून विवाहाच्या आमंत्रणाचे संदेश पाठविले़ सुशिक्षित लोकांना हा प्रयोग खूप आवडला मात्र बुजुर्ग लोकांना ही पद्धत फारशी रुचली नाही़ मोठा मुलगा लंडनला आहे, त्याला हा प्रकार सर्वात आवडला़ या पद्धतीमध्ये केवळ एकदा संदेश पाठवून होत नाही तर वारंवार स्मरण करून द्यावे लागते इतकेच़  - ओ़ पी़ रुंग्ठा, नागरिक, नाशिककर्जबाजारीपेक्षा खर्च कमी करावालग्नसराईच्या काळात लग्नपत्रिका वाटपाचे महत्त्वाचे काम असते आणि ग्रामीण भागात याबाबत अधिक काम असते. मानपान सांभाळणे आणि प्रत्येकापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी लग्नघरातील कुटुंबाला पार पाडावी लागते. पत्रिकांचे वाटप कमी केल्यास खर्च कमी होतो, परंतु मुळात पत्रिकेपेक्षा वाटपावरच मोठा खर्च होतो. त्यातच ग्रामीण भागातील शेतकरी घरातील लग्नासाठी कर्जबाजारी होतात, परंतु लग्न जोमाने साजरे करतात. कर्जबाजारी होण्यापेक्षा मर्यादित खर्च बरा आणि पत्रिका वाटपाची काळानुसार कितपत गरज आहे, याचा विचार करून शक्य त्या ठिकाणी फोन किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे.  - कैलास दळवी, माजी सरपंच, विंचूर दळवीपुतण्याच्या विवाहात मानापमान नाट्य, रुसवे-फुगवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापून वाटल्या़ मात्र पत्रिकांची संख्या मर्यादित ठेवून उर्वरित बहुतांशी सर्व आमंत्रणे ही मोबाइल व सोशल मीडियावरून दिली़ विवाह समारंभात पत्रिका मिळाली नाही याऐवजी तुमचा सोशल मीडियावर संदेश आला व ही पद्धती चांगली असल्याच्या प्रतिक्रियाच बहतांशी नातेवाइकांनी दिल्या़ त्यामुळे आमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास वेळ, पैसा यांची बचतच होईल़ - धनंजय माळोदे, आडगाव

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया