शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:09 AM

कष्टकरी, सोशित, आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या अनिता पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. ...

कष्टकरी, सोशित, आणि स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या अनिता पगारे यांनी महिलांसह युवा वर्गासाठी विविधप्रकारे सामाजिक कार्य केले आहे. त्यांनी कला शाखेतून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळविली होती. तसेच मास्टर इन सोशल वर्क-फॅमिली चाईल्ड वेल्फेअर (एमएसडब्ल्यू) चीही पदवी त्यांनी घेतली होती. १९९०-९९ साली पगारे या नाशिकमध्ये महिला हक्क संरक्षण समितीवर कार्यरत होत्या. कौटुंबिक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी यावेळी महिलांच्या न्यायहक्कासाठी लढा दिला होता.

२०१९ साली त्यांनी कम्युनिटी डेव्हलपमेंट मोखाडा-जव्हार ब्लॉक हा प्रोजेक्ट राबविला होता. या प्रकल्पासाठी त्यांना ‘ओरेहन’ संस्थेच्या वतीने जबाबदारी सोपविण्यात आली होती. या प्रकल्पाच्या त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम बघितले होते. यानंतर अल्पवयीन मुले, तरुण, पदव्युत्तर पदवी घेणारे विद्यार्थी यांच्या समुपदेशनासाठी त्यांनी विविध उपक्रमही राबिवले. २०१५-२०१६साली विश्वास ज्ञान प्रबोधिनी व रिसर्च सेंटरच्या वतीने समन्वयक म्हणून पगारे यांनी युवकांसाठी कार्य केले. तत्पूर्वी २००६-२००८साली पगारे यांनी राज्य सरकारच्या महिला व बालकांच्या विशेष सेलमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. २००१-२००२ साली रेशनिंग कृती समितीच्या संशोधन प्रकल्पामध्येही पगारे यांचा सहभाग होता.

पगारे यांना १९९८साली यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई,च्या वतीने नवभारत युवा आंदोलनांतर्गत त्यांना राज्यस्तरीय ‘युवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये त्यांनी महिलांविषयक कायदे या विषयावर व्याख्याता म्हणून प्रशिक्षणार्थीं पोलीसांना धडे दिले. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.