ओझर : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे पाथर्डी (नाशिक) येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावं, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला.याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. शंतनू देवरे, रश्मी हिरे, विकी नवले या कृषिदूतांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. श्री. सतीशकुमार हाडोळे, उपक्रमाचे अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.
शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 00:09 IST
ओझर : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे पाथर्डी (नाशिक) येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण प्रात्यक्षिके
ठळक मुद्दे शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले.