यावेळी माती परीक्षणातील प्रमुख सूक्ष्म द्रव्य, सेंद्रिय कर्ब, सुक्ष्म जीवाणू यांचे महत्त्व शेतक-यांना सांगण्यात आले. तसेच माती परीक्षणाच्या पद्धती आणि या सर्वांचा शाश्वत शेती व खत व्यवस्थापनासाठी होणारा वापर कृषिदूतांनी समजून सांगितला. माती परीक्षणासाठी असणाºया शासकीय योजनांची माहिती यावेळी शेतक-यांना देण्यात आली. प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकºयांचे मातीचे नमुने देखील घेण्यात आले. कृषीदूतांना श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नवले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. प्रा. नीलेश तायडे, तांबे यांचे कृषिदूतांना मार्गदर्शन लाभले.
सोनेवाडी येथे कृषीदूतांनी केले माती परिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 4:34 PM