देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये अशी चर्चा नेहमी होत असते म्हणून देशमाने , मुखेड फाटा , मानोरी बुद्रुक आदी परिसरात कंकनाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी काळा चष्म्या तर अनेक ठिकाणी एक्स-रे फोटोचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले.दरम्यान , ग्रामीण भागात आजही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहताना अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत असून महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यग्रहण कालावधीत अंधश्रद्धा पाळल्या जातात. घरातील पिण्याच्या पाण्याचे माठ, हांडे , खाद्य पदार्थात तुळशीचे पान मोठ्या प्रमाणात टाकले जातात. तर देवघरातील देवांना देखील सूर्यग्रहण काळात अंघोळ न घालणे अशा विविध प्रकारच्या गोष्टीवर अंधश्रद्धा बाळगल्या जात असल्याचे बघायला मिळाले आहे.---------------------------------दूरचित्रवाणीवरून व शालेय विद्यार्थ्यांनी सांगितल्यामुळे आम्ही सुर्यग्रहणाचा आनंद लुटला. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये हे माहीत होते परंतु त्यासाठी लागणारे विशिष्ट चष्मे उपलब्ध नसल्याने आम्ही एक्स-रे फोटोचा वापर केला.-वंदना दुघड, देशमाने.
सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 1:32 PM