शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

वडांगळीत साकारणार सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:23 PM

सिन्नर : सततचे भारनियमन व पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात कष्ट करणे, त्यात जीवघेणी थंडी व बिबट्याची भीती यांपासून शेतकºयांची सुटका करून त्यांना दिवसाच अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे १२ तास वीज मिळणार आहे.

सिन्नर : सततचे भारनियमन व पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात कष्ट करणे, त्यात जीवघेणी थंडी व बिबट्याची भीती यांपासून शेतकºयांची सुटका करून त्यांना दिवसाच अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. सुमारे २५ कोटी रुपयांच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे १२ तास वीज मिळणार आहे. वडांगळीतील शेतकºयांना दिवसा अखंडितपणे पुरेशी वीज मिळण्यासाठी सरपंच सुनीता सैद व उपसरपंच नानासाहेब खुळे यांनी २९ डिसेंबर २०१६ रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली होती. इतर राज्यांप्रमाणे सौर ऊर्जा प्रकल्पाची पथदर्शी योजना गावात राबविण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. तथापि, शासनाचे सौरऊर्जेचे धोरण ठरविण्यात येत असून धोरण नक्की होताच वडांगळीच्या प्रकल्पाबाबत विचार करण्याचे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले. त्यानंतर शासनाने १४ जून २०१७ रोजी मुख्यमंत्री सौर कृषी योजना जाहीर करताच ग्रामपंचायतने पुन्हा १६ जून २०१७ रोजी ऊर्जा विभागाला गावातील शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबविण्याची मागणी केली. त्यानंतर उपसरपंच नानासाहेब खुळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, पोपट सैद आदींनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन हा प्रकल्प प्राधान्याने राबवविण्याची मागणी केली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेला (मेडा) कार्यवाहीचे आदेश दिल. त्यानुसार ३० जून २०१७ रोजी मेडाने नाशिक येथील अधिकाºयांना या योजनेची उपयोगिता तपासण्यास सांगितले. वडांगळी येथे येवून त्यांनी योजनेची उपयोगिता तपासून तसा अहवाल मेडाकडे पाठविण्यास सांगितले. वडांगळी येथे वीजउपकेंद्रालगत जागा असल्याने व व शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने महाजनकोने वडांगळी उपकेंद्रालगत सौर वीज प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे देवपूर शिवारातही खासगी व्यक्तीमार्फत २ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प साकारत आहे.जागा मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरु होणार..वडांगळी ग्रामपंचायत हद्दीतील जागा मिळण्यासाठी महाजनकोने महसूल विभागाला प्रस्ताव दाखल केला असून वडांगळी शिवारात फिरणाºया वीजवाहिन्यांना एका वेळी आवश्यक असणाºया ५ मेगावॅटविजेच्या प्रकल्पासाठी १० हेक्टर जागेची आवश्यकता असून ही जागा ३० वर्षे भाडे कराराराने महाजनकोला दिली जाणार आहे. महाजनको निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपनी मार्फत हा प्रकल्प साकारणार आहे.वडांगळीच्या शेतकºयांना फायदा ..वडांगळी ग्रामपंचायतच्या वतीने या प्रकल्पासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. प्रकल्पातून तयार होणारी वीज वडांगळीच्या प्रत्येक शेतकºयाला प्राधान्याने दिवसा वीज देण्यात यावी व उर्वरित वीज शेजारील गावातील शेतकºयांना देण्याच्या अटीवरच हा प्रकल्प होत आहे. त्यामुळे वडांगळी व कोमलवाडी फीडरवरील शेतकºयांना सर्वात अगोदर या प्रकल्पातून वीज मिळणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक