निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन ही झाले उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात आला बोअर केल्या वर तेथे चांगले पाणीही लागले त्या दोन वर्षापासून तो बोर तसाच प्लॅस्टिक पिशवीने झाकलेला आहे. नंतर त्या बोअरकडे फिरकु नही पहीले नाही. परीसरातील रहिवासी तो सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.आदिवासी वस्तीत नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी एकाच हातपंपाचे सोय आहे त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो. किकवारी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वागदर वस्तीत आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे मोलमजुरीने उदरनिर्वाह करतात. मजुरीवर असल्याने दिवसभर काम करून सायंकाळी पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नाहीतर आपली मजुरी बुडवून कुटुंबातील किमान एका सदस्याला घरातील पाणी भरण्यासाठी घरी राहावे लागते.वागदर वस्तीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आहे. शाळा सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना हात पंपाचा पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागतो. पाण्याची तेथे कोणतीही सोय नाही, मात्र सौर पंप मंजूर असूनही वस्तीतील लोकांना हात पंपावरील पाण्याचा वापर करावा लागतो.जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी संपर्क केआ असता ठेकेदार पुढच्या आठवड्यात काम चालू करत आहे, असे प्रत्येक वेळेस सांगतात. पण तो पुढचा आठवडा कधी दोन वर्षापासून उगवला नाही. तरी जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांनी ठेकेदाराला सांगून वागदर वस्तीवरील सौर पंपाचे काम लवकरात लवकर करून तेथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी मागणी वागदर वस्तीवरील ग्रामस्थांनी केली आहे.जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या निधीतून वागदर वस्ती व दोन वर्षांपूर्वी सौर पंप मंजूर आहे तेथे फक्त बोअरवेल करून ठेवला आहे. परंतू तिथे कुणीही पाहिले नाही तरी लवकरात लवकर पंपाचे काम करून वागदर वस्तीवरील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा.- पूजा अहिरे, ग्रामपंचायत सदस्य, किकवारी बुद्रुक.आमच्या वागदर वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी एकच हातपंपाची सोय आहे येथे सौर पंप मंजूर असून ते काम अपूर्ण अवस्थेत गेल्या दोन वर्षापासून आहे. तरी लवकरात लवकर सौर पंप सुरु करून आमच्या वस्तीतील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.-सुदाम पवार, ग्रामस्थ, वागदर वस्ती.(३१ निकवेल)वागदर वस्तीवर दोन वर्षापासून झाकुन ठेवलेला सौर पंप.
सौर पंप दोन वर्षापासून मंजूर पण सुरु करण्यासाठी मुहूर्त सापडेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 6:31 PM
निकवेल : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वागदर वस्तीत २ वर्षांपूर्वी ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत सौर पंप मंजूर झाला होता जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन ही झाले उद्घाटन झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात फक्त तेथे बोअर करण्यात आला बोअर केल्या वर तेथे चांगले पाणीही लागले त्या दोन वर्षापासून तो बोर तसाच प्लॅस्टिक पिशवीने झाकलेला आहे. नंतर त्या बोअरकडे फिरकु नही पहीले नाही. परीसरातील रहिवासी तो सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
ठळक मुद्देपरीसरातील रहिवासी तो सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.