मालेगाव : शालेय पोषण आहार योजना सेंट्रल किचन पद्धतीने राबविण्यात यावी, माल पुरवठा करणाऱ्या गाडीत डिजीटल वजनकाटा असावा, महिला शिक्षिकांना बीएलओ चे आदेश देण्यात येऊ नये आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसिलदार डी. आर. जगताप व गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना सादर करण्यात आले आहे.मालेगाव तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, शासनाकडे असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आदि मागण्या संघाच्या पदाधिकाºयांनी केल्या आहेत. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, तालुकाध्यक्ष संदिप पाटील, सरचिटणीस विलास पवार, तालुका नेते पुरूषोत्तम इंगळे, कार्याध्यक्ष मधू पाटील, एम. के. अहिरे, कोषाध्यक्ष मनोहर जाधव, संपर्क प्रमुख हंसराज देसाई, कैलास बच्छाव, श्रीराम बच्छाव, संजय मांडवडे, जिभाऊ जाधव, विश्वनाथ पाटील, अजय ठाकरे, मोहन खैरनार, संजीव जायखेडकर, सुर्यकांत देसले, श्रीराम ह्याळीज, योगेश देवरे, मधुकर पवार, योगेश शेवाळे, बाळा पाटील, राकेश पाटील, दिलीप महाले, निंबा भामरे, प्रभाकर अहिरे, नाजिम देशमुख, विजय मोरे, हरिभाऊ जगताप, सुजेत पवार, सिद्धार्थ उशिरे, सुनिल शेलार, दिपक शिरसाठ, पोपट वायडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांच्या विविध समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 7:06 PM
शालेय पोषण आहार योजना सेंट्रल किचन पद्धतीने राबविण्यात यावी, माल पुरवठा करणाऱ्या गाडीत डिजीटल वजनकाटा असावा, महिला शिक्षिकांना बीएलओ चे आदेश देण्यात येऊ नये आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसिलदार डी. आर. जगताप व गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना सादर करण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक संघाचे नायब तहसिलदारांना निवेदन